टाकळीभान ग्रामपंचायत सदस्य सदस्यपदाची जबाबदारी झुगारुन मासिक बैठकांना दांडी गावगाडा चालवण्यास ते असमर्थ की काय ?

टाकळीभान ग्रामपंचायत सदस्य सदस्यपदाची जबाबदारी झुगारुन मासिक बैठकांना दांडी ,गावगाडा चालवण्यास ते असमर्थ की काय ?
श्रीरामपुर तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या आसलेल्या व राजकिय प्रतिष्ठेच्या १७ सदस्य संख्या आसलेल्या टाकळीभान ग्रामपंचायत सदस्य सदस्यपदाची जबाबदारी झुगारुन मासिक बैठकांना दांडी मारीत आसल्याने गावगाडा चालवण्यास ते असमर्थ दिसत आसल्याने गेल्या दोन वर्षात जवळपास दहा बैठका कोरम अभावी पुढे ढकलल्या गेल्याची धक्कादायक माहीती आज आयोजित केलेल्या मासिक बैठकित पुढे आली आहे.
श्रीरामपुर तालुक्यातील मोठ्या आसलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १७ इतकी आहे. गेल्या आडीच वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकित मतदारांनी महाविकास आघाडीच्या १६ सदस्यांना निवडुन देवुन एकहाती सत्ता दिली होती. माञ महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकहाती सत्ता अजिर्ण झाल्याने सहा महीण्याच्या गोडीगुलाबीच्या संसारानंतर नेत्यांच्या ईगोमुळे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सत्तेची शक्ल झाली. त्याचा फटका आजपर्यंत प्रामाणिकपणे महाविकास आघाडीला मतदान केलेल्या मतदार नागरीकांना बसत आहे. गेल्या दोन वर्षांपासुन ग्रामपंचातीची विकास कामे रोडावल्याने नागरीकांच्या समस्यात वाढ झाली आसली तरी सदस्य व त्यांचे नेते ईगोत आडकल्याने समस्या सोडवण्यासाठी वेळ द्यायला तयार नाहीत.
विद्यमान सदस्यात ९ महीला सदस्य आहेत तर आठ पुरुष सदस्य आहेत. सरपंच पदी महीला विराजमान आसल्या तरी मासिक बैठकिला महीला सदस्यांना उपस्थित ठेवण्यास त्या कमी पडल्याचे दिसुन येते.त्यामुळे महीला सदस्यांच्या पतिचाच कामकाजात हस्तक्षेप आजपर्यंत दिसुन आलेला आहे. कागदी घोडे नाचवण्यासाठी अनेक सदस्यांच्या ईतीवृत्तावर घरबसल्या सह्या घेतल्या जात आहेत. सत्ताधारी गटाच्या कार्यकाळात एकुण २७ मासिक बैठका झालेल्या आसल्या तरी त्यापैकि सुमारे १० बैठका गणपुर्ती ( कोरम )अभावी तहकुब कराव्या लागल्या आहेत. मासिक बैठकिचा अजेंडा ३ दिवस आगोदर देण्याचा नियम आसला तरी ७ दिवस आगोदर अजेंडा देवुनही सदस्यांची बैठकिला दांड्या मारल्याचे दिसुन येते. नियमित बैठक तहकुब केल्यानंतर त्याच महीण्यात घेण्यात येणाऱ्या बैठकिला कोरमची आवश्यकता नसल्याने त्या बैठकित कामकाजाचे निर्णय घेण्याची प्रथा या ग्रामपंचायतीत रुढ होताना दिसत आहे. काल गुरुवार २७ जुलै रोजीची आयोजित मासिक बैठकही केवळ ७ सदस्य उपस्थित आसल्याने गणपुर्ती अभावी बैठक तहकुब करावी लागल्याने आतापर्यंत तहकुब झालेल्या बैठकिंचा भांडाफोड झाला. विषेश म्हणजे नियमित बैठक तहकुब होउन पुढील चार पाच दिवसात घेण्यात येत आसली तरी त्या तहकुब बैठकिचे ईतिवृत्त नियमित बैठकिच्या तारखेलाच घेण्यात येत आसल्याचीही माहीती यावेळी समोर आली आहे. बैठकिसाठी उपसरपंच कान्हा खंडागळे, सदस्य दिपक पवार, सुनिल ञिभुवन, अशोक कचे,सदस्य पती जयकर मगर, भाऊसाहेब पटारे, सरपंच पती यशवंत रणनवरे, ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव उपस्थित होते.
काही सदस्य नियमित बैठकिला वारंवार गैरहजर रहात आसल्याने कोरम अभावी सभा तहकुब करण्याचा पायंडा पाडला जात आहे. आंम्ही प्रत्येक बैठकिला वेळेपुर्वी हजर असतो माञ काही सदस्य जाणुन बुजुन गैरहजर राहुन तहकुब बैठकित सोयीचे कामकाज करुन घेत आहेत. नागरीकांच्या समस्यावर चर्चा करण्यासाठी मासिक बैठकितच चर्चा होणे गरजेचे आहे. मासिक बैठकिसाठी वेळ नसलेल्या सदस्यांनी पद आडवुन बसण्यापेक्षा पदाचे राजीनामे द्यावेत.
कान्हा खंडागळे – उपसरपंच
नागरीकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या समस्या सोडण्यासाठी बैठकित चर्चा होणे गरजेचे आहे. समस्यांची सोडवणुक व्हावी यासाठी आंम्ही बैठकिसाठी वेळ देतो. माञ कोरम अभावी सभा तहकुब होत आसल्याने प्रश्न मार्गी लागत नाहीत. वारंवार ठराविक सदस्यांमुळे बैठक तहकुब होणे हा गंभिर प्रकार सुरु झाला आहे.
दिपक शंकरराव पवार – सदस्य ग्रामपंचायत.
सरपंच या अचानक अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेल्याने मासिक बैठकिला उपस्थित राहु शकल्या नाहीत.
यशवंत रणनवरे — सरपंच पती.
ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी नुसार मासिक बैठकिच्या तीन दिवस आगोदर सदस्यांना अजेंडा देणे गरजेचे आसले तरी सहा ते सात दिवस आगोदर सदस्यांना मासिक बैठकिचा अजेंडा दिला जातो. सचिव म्हणुन बैठकिचे कामकाज नियमानुसारच केले जाते.
रामदास जाधव — ग्रामविकास अधिकारी.