ज्या शाळेने मला घडविले त्या शाळेचे व गावाचे ऋण कधी विसरणार नाही -राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संजय गायकवाड,

ज्या शाळेने मला घडविले त्या शाळेचे व गावाचे ऋण कधी विसरणार नाही -राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संजय गायकवाड,
जि.प. प्राथमिक शाळा घुमनदेव येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी अतिथी म्हणून गावचे सुपुत्र राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक संजय गायकवाड व सौ,शितल गायकवाड होते.
संजय गायकवाड सौ, शितल, त्यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्रीपत गायकवाड होते. संजय गायकवाड साहेब यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की जिद्द व कष्ट करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते, माझे शिक्षण याच शाळेत झाले.आपणही शिकून मोठे व्हावे. गावचे ऋण मी कधीही विसरणार नाही,
यावेळी गायकवाड यांचा शाळेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद वाघ सर यांनी केले. गायकवाड यांच्या वतीने सर्व मुलांना शालेय वर्षाच्या सुरुवातीलाच मुलांना शालेय उपयुक्त ठरतील अशा वह्यांचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी, सागर वाघमारे ,सरपंच श्रीपत गायकवाड,उपसरपंच गीताराम जाधव,बाळासाहेब कांगुने,शिवाजी शिरसाठ, काय्युंम भाई, आप्पासाहेब मा जाधव, सचिन रा गाडेकर, संजीव घोडे आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय शिंदे सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका महापुरे मॅडम यांनी मानले.