बेलापुरला दोन मोटारसायकलच्या अपघातात एक ठार एक गंभीर

बेलापुरला दोन मोटारसायकलच्या अपघातात एक ठार एक गंभीर
दोन मोटारसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला असुन जखमीवर दवाखान्यात उपचार सुरु आहे या बाबत समजलेली माहीती अशी की श्रीरामपुर वार्ड नंबर ७ मोरगे वस्ती येथील चंद्रकांत माधव बाहुले हे (गाडींनंबर एम एच ऐ सी ९३९६ ) श्रीरामपुर हुन बेलापुरकडे येत होते बेलापुरकडे येत असताना त्यांच्या मोटारसायकलचे पेट्रोल संपल्यामुळे ते पायी गाडी ढकलत चालले होते ओम साई पेट्रोल पंपानजीक बजाज डिस्कव्हर गाडी नंबर एम एच १७ऐ डब्लू ५४९ या गाडीवर पाहुणेनगर येथील दोन जग बेलापुरकडे येत होते त्यांच्या गाडीने पाठीमागुन बाहुले यांस जोराची धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले तसेच बजाज डिस्कव्हरी वरील एक जण जखमी झाला घटनेची माहीती मिळताच बेलापुरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल संपत बडे हरिष पानसंबळ भारत तमनर तातडीने घटनास्थळी दाखल झाले या वेळी मोठी गर्दी जमली होती दोन्ही जखमींना श्रीरामपुर येथे हलविण्यात आले त्यात चंद्रकांत बाहुले यांना जास्त मार लागलेला होता उपचारापूर्वीच चंद्रकांत बाहुले हे मयत झाले मयताचे नातेवाईक शोधणे हे पोलीसापुढे मोठे अव्हान होते गाडी नंबरवरुन केवळ नावाचाच उलगडा होत होता अखेर व्हाटस्अप मुळे मयत बाहुले यांचे नातेवाईक शोधण्यास मदत झाली दुसऱ्या जखमीची देखील परिस्थीती गंभीर आहे त्यास पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविणार आहेत या घटनेचा तपास सहाय्याक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे हे करत आहेत