येथे बलात्कारातील आरोपीला विष पाजून मारले*

*गेवराईत बलात्कारातील आरोपीला विष पाजून मारले*
*पाच जणाविरूध्द गुन्हा दाखल*
बलात्कारातील आरोपी पोलीस ठाण्यात हजर होत नसल्याने पीडितेच्या नातेवाईकांनी विष पाजून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना बगेवाडी गेवराई (ता. गेवराई) येथे घडली. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोन जण फरार आहेत.
गेवराई तालुक्यातील बगेवाडी येथील गंगा भोसले या तरुणाविरोधात काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र, तो पोलीस ठाण्यात हजर झाला नव्हता. तु पोलिसांत हजर का होत नाही?असे म्हणून पीडितेच्या नातेवाईकांनी दोन दिवसांपूर्वी गंगा भोसले याला बेदम मारहाण करुन त्याला कीटकनाशक पाजले होते.यांनंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते . मात्र, त्याचा मंगळवारी (दि.२६) मृत्यू झाला. या प्रकरणी गंगा भोसले याची पत्नी गंगुबाई भोसले यांनी तलवाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून रमेश भाऊराव पवार, कृष्णा उर्फ होड्या चव्हाण, रवी लक्ष्मण शिंदे, आकाश लक्ष्मण शिंदे (तिघे रा. बगेवाडी) आणि विष्णू राघू काळे (रा. तलवाडा) या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी रमेश भाऊराव पवार, कृष्णा उर्फ होड्या चव्हाण आणि विष्णू राघू काळे या तीन जणांना अटक केली असून दोघे फरार दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा तपास चालू असल्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे पुढील तपास करीत आहेत.