ग्रामिण साहित्यिक ,कथाकथनकार नामदेवराव देसाई यांचे निधन*

*ग्रामिण साहित्यिक ,कथाकथनकार नामदेवराव देसाई यांचे निधन*
श्रीरामपूरःख्यातनाम जेष्ठ साहित्यिक व आपल्या विनोदी कथाकथानाने राज्यात नावलौकिक प्राप्त नामादेवराव देसाई यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. स्व.देसाई हे श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर गावचे रहिवासी.सन १९६५दरम्यान ते बेलापूरच्या जे.टी.एस हायस्कूलमध्ये अध्यापक होते.सन १९७३ते १९८९या काळात त्यांनी अशोक कारखान्यात अधिकारी म्हणून व त्यानंतर मुळा कारखान्यात,अधिकारी म्हणून काम केले. ‘दै.सार्वमत’ मधील त्यांच्या गुदगुल्या,नामानिराळा,धमालनामा या मिश्किल व विनोदी सदरांनी त्यांना ग्रामिण साहित्यिक व विनोदी कथाकार अशी ओळख दिली.त्यांची नामानिराळा,पंचनामा,धमालनामा,भ्रष्टाचार कसा करावा हि पुस्तके गाजली.महाराष्ट्र टाईम्स,लोकसत्ता,लोकमत,सार्वमत स्नेहप्रकाश,शब्दालयसह त्यांनी अनेक दिवाळी अंकात लिखाण केले.त्यांचा विनोदी कथाकथनाचा व स्व.देसाई,त्यांचे विद्यार्थी प्रा.हंबीरराव नाईक व भास्कर खंडागळे या ञिकुटाचा हास्यकल्लोळ हा कार्यक्रमही खूप लोकप्रिय ठरला.सन १९९७मध्ये नगरच्या साहित्य संमेलनाच्या आयोजनात स्व.देसाई यांचा मोलाचा वाटा होता. राज्यातील साहित्यिकांशी त्यांचा दांडगा संपर्क होता.कोणतीही गोष्ट मिश्किलपणे सांगायची त्यांची खास शैली होती.त्यांचे लेखन उपहासात्मक असले तरी ते बोचत नसायचे.वर्तमान राजकीय व सामाजिक घडामोडीवर खुमासदार भाष्य करणे यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी ‘आस्था’या चिञपटात सरपंचाची भुमिका केली होती.बेलापूर व अशोकनरला असताना त्यांनी अनेक नाटके बासविली.त्यातील काही नाटकांत त्यांनी आभिनयही केला.असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या स्व.देसाई यांच्या निधनाने जिल्ह्यातील साहित्यिक ,पञकारितेसह विविध क्षेञातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.त्यांच्या पश्चात मुलगा नितीन भक्ती प्रिती तृप्ती दिप्ती मुली सुन जावई नातवंडे असा परिवार आहे