संपादकीय
माजी मंत्री महादेवजी जानकर यांना कोरोना ची लागण लवकर बरे होवो म्हणून देवाला दुग्धाभिषेक

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेवजी जानकर यांना कोरोना ची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती लवकर बरी यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष अहमदनगर च्या वतीने गळणींब येथील सिद्धेश्वर महादेवाला दुधाचा अभिषेक करण्यात आला. या देशातील उपेक्षित वंचितांचा आवाज व अनेक तरुणांना राजकीय पटलावर आनणारे जानकर साहेब यांची तबीयत बरी होऊन त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी देवाला दुधाअभिषेक करून प्रार्थना करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रभारी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, जिल्हा सचिव डॉ सुनीलचिंधे ,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार खेमणर, गोरखमामा येळे, दादासाहेब कुसेकर,नानासाहेब मुंजाळ सचिन लाटे,अर्जुन बाचकर, प्रभाकर लाटे, नामदेव आयनर आदी उपस्थित होते