राजकिय

संत ज्ञानेश्वर महाराज शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व….*

*आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व….*

 

 

 

आळंदी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत संत ज्ञानेश्वर महाराज शेतकरी विकास पॅनलने ९/४ असा माऊली कृपा/रघुनाथ महाराज पॅनलचा पराभव करत सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व राखले. 

 

,आळंदी देवाची सोसायटीच्या निवडणुकीकडे आळंदी आणि केळगावचे अनेक दिग्गज नेतेमंडळी लक्ष देऊन होते. १३ संचालक पैकी २ जागा निवडणुकीच्या आदल्या दिवशी बिनविरोध झाल्या त्यात दोन्ही पॅनलला एक एक जागा मिळाली, उर्वरित ११ संचालक पदासाठी २४ उमेदवार उभे असल्याने दुरंगी लढत होती. केळगाव आणि आळंदी म्हणून आळंदी विविध कार्यकारी सोसायटी सत्ता केंद्रची सूत्र हलतात ,या सोसायटीवर सत्ता काबिज करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सह अनेक दिग्गज नेते निवडणूक प्रचार प्रक्रियेत सामील होते. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची होती. सोसायटीच्या ४४२ सभासदांपैकी ४१४ सभासदांनी मतदान केले. यामध्ये सर्व साधारण गटात २९ मते बाद झाल्यामुळे ३८५ मते वैध झाली. महीला गटात १० मते बाद झाल्यामुळे ४०४ मते वैध झाली. विशेष म्हणजे इतर मागासवर्ग गटात सर्वाधिक ६० मते बाद झाल्यामुळे ३५४ मते वैध झाली. सायंकाळी ५ ते रात्री सात पर्यंत मतमोजणी सुरू होती. सभासदांनी संत ज्ञानेश्वर महाराज पॅनलच्या बाजूने कौल देऊन पॅनलच्या १३ पैकी ९ जागांवर उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस.एम.धादवड यांनी जाहीर केले.

 

विजयी उमेदवार दिलीप मुंगसे २२०, बाबुलाल घुंडरे २१७, रोहीदास मुंगसे २१७, वासुदेव मुंगसे २०६, ज्ञानेश्वर घुंडरे १९८, सोमनाथ मुंगसे १९६, विलासराव घुंडरे १८९, अनिल भांडवलकर १८३, अरुणा घुंडरे २६०, सिंधूबाई कुऱ्हाडे २३९, संतोष विरकर २०२ हे ११ जन संचालकपदी निवडून आले. तसेच माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील आणि सुभाष सोनवणे हे दोघे संचालक पदी बिनविरोध निवडून आले आहेत. माजी नगरसेवक संभाजीराव कुऱ्हाडे आणि माधवराव कुऱ्हाडे यांचा अवघ्या एक दोन मताने पराभव झाला. सोसायटीच्या विद्यमान चेअरमन सुशीला कुऱ्हाडे यांचे पती योगेंद्र कुऱ्हाडे यांचा सुध्दा पराभव झाला. सर्व साधारण गटात कुऱ्हाडे यांच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. सोसायटीत केळगावतील ७ तर आळंदीतील ६ संचालक झाले आहेत. येणाऱ्या आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत सोसायटीत झालेल्या राजकारणाचा परिणाम दिसून येईल. विजयी उमेदवारांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंद साजरा केला.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
03:01