डिग्रस येथील भाविकांच्या नवसाला पावणारे जागृत देवस्थान जायबा महाराज यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी जालिंदर बेल्हेकर तर…

डिग्रस येथील भाविकांच्या नवसाला पावणारे जागृत देवस्थान जायबा महाराज यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी जालिंदर बेल्हेकर तर…
राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील भाविकांच्या नवसाला पावणारे जागृत देवस्थान जायबा महाराज यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी जालिंदर बेल्हेकर यांची तर उपाध्यक्षपदी जगन्नाथ पवार व खजिनदार पदी केशव बेल्हेकर यांची व सचिव पदी आसिफ पठाण यांच्या सर्वानुमते निवडी जाहीर करण्यात आल्या
डिग्रस येथील जायबा महाराज मंदिर व हनुमान मंदिर प्रांगणात सकाळी १० वाजता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालाबाद प्रमाणे २२ मार्च व २३ मार्च रोजी होणाऱ्या यात्रा उत्सवाचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी डिगसचे माजी सरपंच रावसाहेब पवार, माजी पंचायत समिती सदस्य सचिन भिंगारदे, प्रकाश तायडे ज्येष्ठ नागरिक बापूसाहेब बेल्हेकर ,प्रा उत्तम कदम, प्रवीण भिंगारदे, जगन्नाथ गिरगुणे, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व राजुदादा थेटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या
या बैठकी मध्ये यात्रे निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांची दर्शनाची व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे श्री क्षेत्र पुणतांबा येथून गंगा जल आणलेल्या कावड भक्तांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे दिनांक २२ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता छबिना फटाक्यांची आतषबाजी होऊन ९ वाजता लोक कलावंतांचा (लोकनाट्य तमाशा होईल तर दिनांक २३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता लोक कलावंतांच्या हजर्याचा कार्यक्रम होणार आहे दुपारी चार वाजता नामावंत मल्लांच्या कुस्त्याचा जंगी हगामा होईल या दोन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवानिमित्त जायबा महाराजांच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे हा यात्रा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी समस्त गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी केले,
या बैठकीसाठी संदीप कोकाटे गोरक्षनाथ देशमुख,शिवाजी झीने दत्तू महानोर,सद्दाम बेलेकर, सुभाष बेलेकर, ज्ञानेश्वर भिंगारदे, अनिल शिंदे, पत्रकार राजेंद्र पवार, सोपान गावडे, काका गावडे, मोहन बनसोडे, राजू भिंगारदे, उमेश पवार, अनिस सय्यद, शरद पवार, बापू मोरे, सुरेश पवार,
दत्तू गावडे दत्ता पटेकर राजु पवार तानाजी पवार, यावेळी गावकरी उपस्थित होते