श्री वृद्धेश्वर शिव मंदिर रस्त्याची दुरुस्ती व पुनर्निर्माण करावे व लव जिहाद बाबत कठोर कायदे करावे मागणीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन

श्री वृद्धेश्वर शिव मंदिर रस्त्याची दुरुस्ती व पुनर्निर्माण करावे व लव जिहाद बाबत कठोर कायदे करावे मागणीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन
महाराष्ट्रातील नाथ भक्तांचे श्रद्धास्थान श्री.चैतन्य मच्छिंद्रनाथ समाधी देवस्थान, श्री. चैतन्य कानिफनाथ समाधी मंदिर देवस्थान, श्री वृद्धेश्वर शिवमंदिर येथील रस्ते दुरुस्ती व पुनर्निर्माण करण्यासाठी तसेच लव जिहाद वर कठोर कायदा करावा असे निवेदन, गुरुवर्य जगद्गुरु कृष्णदेव नंदगिरीजी महाराज द्वारका पीठाधीश्वर यांचे हस्ते महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन देण्यात आले यावेळी साई धनवर्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय देशमुख यांनी मुख्यमंत्री साहेबांना ट्रॉफीच्या स्वरूपात पुरस्कार देऊन सन्मानित केले याप्रसंगी श्री.अंतोष धात्रक, श्री. विश्वनाथ किरकिरे, श्री. हर्षल चव्हाण, श्री. नितीन अमृतकर, तसेच सरपंच श्री संतोष जाधव, कु. पवनराजे भोसले व मच्छिंद्रनाथ देवस्थानाचे सचिव श्री. बाबासाहेब रामभाऊ म्हस्के व श्री राम चोथे व्रृद्धेश्वर देवस्थान अध्यक्ष यात्रा कमिटी आदी उपस्थितीत होते