संस्कारांची लयलुट होऊ नये म्हणून साहित्यिक समाजाला जगवतात*

*संस्कारांची लयलुट होऊ नये म्हणून साहित्यिक समाजाला जगवतात*
संस्कारा हे पावित्र्य असुन संस्कृतीच व समाजाचं मुळ असल्याने मुळावर अघात झाला कि झाड आपोआप कमकुवत होऊन दुबळ होत .दुबळ झाल्यानंतर समुळ नष्ट होण्यासाठी फार वेळ लागत नाही.समाजाची घट्ट असं पाळंमुळं असणारा संस्कार आणि त्यांच संस्कार कोणीही हल्ला करून संस्कृती आणि पर्यायाने समाज कमकुवत करू नये म्हणून साहित्यिक समाजाला नेहमी जागवतात . आपल्या कार्याचा जागर अखंड तेवत ठेवतात. संस्कारावर हल्ला झाला कि त्याचे परिणाम आपोआप संस्कृती वर समाजावर पर्यायाने राष्ट्र वर होतात. साहित्यिक हे संस्कारावर हल्ला होऊन समाज देश प्रभावीत होऊ नये म्हणून सदैव समाजाला जागृत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.साहित्य हे अमृत धार आहे.ज्याची बरसात साहित्यिक वेळ प्रसंग कालावधी नुसार त्या त्या वेळी करत असतात . सामाजिक संस्कार व सांस्कृतीक जीवन मुल्य रक्षणात साहित्यिकांचे अनमोल योगदान असते. पवित्र्या म्हणजेच संस्कार आणि हाच संस्कार आपलं मुल्य निश्चित करत असतो ठरवत असतो .आपण स्वतः काही केलं काय अथवा नही केलं काय पण आपलं मुल्य वाढविण्यासाठी वृद्धिंगत करण्यासाठी सार्वजनिक पातळीवर एक त्रस्थ शक्ति सतत कार्यरत असते. हि त्रस्थ शक्ति म्हणजे साहित्यिक शरिर मन बुद्धी विचार आणि कृती ने व्यक्ति पवित्र असला पाहिजे.तसच आपलं पावित्र्य काय हे स्वतःला समजलं पाहिजे .तसंच शरिराचे मनाचे बुद्धी विचारांचे पावित्र्य टिकवून रहिल पाहिजे तसंच ते वृद्धिंगत झाल पाहिजे म्हणून साहित्यिक हे सद्विचारांची पेरणी निस्वार्थ भावनेने करत सामाजिक हित जोपासत असतात.संस्कार आणि संस्कृती याची लयलुट हि समाजाच्या अधिपतनास जबाबदार असते . संस्कारांची लयलुट होता कामा नये हिच लयलुट थांबविण्यासाठी साहित्य आपलं जीवन समर्पित करतात. संस्कार आणि संस्कृती टिकवणे वाढवणे हा विराट उदेश डोळ्यासमोर ठेवून साहित्यिक रात्रंदिवस लोक जागृती करत असतात. आक्रमण अतिक्रमण हे कधीही अगोदर संस्कारांवर होत आणि मग आपोआप संस्कृती समाज हे प्रभावीत होतात. नंतर त्याचे विस्तृत परिणाम हे समाज व्यवस्थेवर होत असतात . गावोगावी गल्लोगल्ली रात्री अपरात्री चोरांचा त्रास होउ नये अथवा चोर येऊ नये या उद्देशाने गुरखी कडा पाहरा देत सगळ्यांना जाग राहण्याच आव्हान रात्रभर करत असतात.यामुळे अनेक ठिकाणी चोरांना चोरी करण शक्य होत नाही.आपणही तो आवाज ऐकून जागे होतो. तसंच सगळ्यांना जाग ठेवणं हाच मुख्य हेतू उदेश गुरखी यांचा असतो . साहित्यिक हे समाजात अहोरात्र जागृती निर्माण करून प्रबोधन करत असतात ज्याचा परिणाम स्वरूप आपण आपले संस्कार आणि संस्कृती जीवनमूल्ये याच्या प्रति सचेत होतो . प्राचिन काळी जेव्हा जेव्हा आपल्या देशावर परकियांची आक्रमण झाली त्या त्या वेळी त्यांनी अगोदर आपली पुस्तकालय जाळली नष्ट केली.महणजे त्या मागे हेतू हाच होता आणि आपले संस्कार नष्ट त्यांचे संस्कारा आपल्याला स्वीकारण्यास भाग पाडण पण तरी सुद्धा त्या वेळी आपल्याला ऋषी मुनी यांनी हे तत्वज्ञान गुरू शिष्य परंपरा निर्माण करत जतन केले टिकवले पुढं नेले व आपल्या संस्कार संस्कृती चे रक्षण केले .आज सुद्धा पश्चिमात्य देशातील अनेक घटना घडामोडी ह्या आपले संस्कार नष्ट करण्यासाठी टपुन आहेत.परंतु साहित्य समाजाला नियमित जागृत ठेवत असल्याने संस्कार आणि संस्कृती वर आक्रमण करणार्या पश्चिमात्य देशातील वृत्ती प्रवृत्ती यांना जागृत साहित्यिक शिरकाव करू देत नाहीत. म्हणजे एकंदरीत आपली संस्कृती संस्कार आणि जीवनमूल्ये रक्षणासाठी साहित्यिक स्वतः कडक पाहरा देऊन आपल्याला सदैव जगत ठेवतात.हि समाजाच्या प्रति साहित्यिक यांची खुप मोठी उदात्त भावना आणि जबाबदारी आहे.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301