कृषीवार्ता

पिंपळगाव माळवी आणि वडगाव गुप्ता या गावातील शेतकरी बांधवांचा २०११ पासून प्रलंबित असलेला

पिंपळगाव माळवी आणि वडगाव गुप्ता या गावातील शेतकरी बांधवांचा २०११ पासून प्रलंबित असलेला

नगर तालुक्यामधील पिंपळगाव माळवी आणि वडगाव गुप्ता या गावातील शेतकरी बांधवांचा २०११ पासून प्रलंबित असलेला मार्गी लागला असून मौजे वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर येथील अधिसूचनेच्या अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्र “औद्योगिक क्षेत्राच्या (नगर एम आय डी सी )विकासासाठी आवश्यक नाहीत”. असे.राज्य शासनाचे मत झालं आहे. पोट-कलम (३) कलम २. खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र जनरल नलसिला (१९०४ या संदर्भ महाराष्ट्र शासन याद्वारे खालील उल्लेख केलेल्या या गोष्टी झाल्या आहेत का या गोष्टी करायच्या आहेत.महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ व प्रकरण सहा दिनांक ३ मार्च २०२३ पासून करीत आहे. आणि सदर क्षेत्र हे जाहीर केलेल्या औद्योगिक क्षेत्राचा (नगर एम आय डी सी)चा भाग राहणार नाही. राज्यपालांचे आदेशानुसार किरण जाधव, शासनाचे अवर सचिव ह्यांनी काढल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी दिली.

मौजे वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी येथील शेकडो शेतकरी बांधवांचे ४६१.७४ हेक्टर क्षेत्र विना अधिसूचित करण्यासाठी सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत आज दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी स्थळ पाहणी दौरा पार पडला.

नगर तालुक्यातील या दोन्ही गावचा हा अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याचा विषय होता. यासंदर्भात अनेक शेतकरी बांधव गेल्या दहा अकरा वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत होते आग्रह धरत होते. शेतकरी बांधवांचा आग्रह आणि या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन आमदार प्राजक्त तनपुरे यानी या प्रश्नाला सरकार दरबारी नेऊन न्याय देण्याचा विडा उचलला. त्या अनुषंगाने दिनांक १५ जून २०२१ रोजी मंत्रालयामध्ये तत्कालीन मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्कालीन उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे व विद्यमान सरकार मधील उद्योग मंत्री उदय सामंत ह्यांचीही भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला होता.यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये सदर क्षेत्र “विना अधिसूचित” करण्यासाठी हाय पावर कमिटी नेमण्याचा निर्णय झाला. याला अनुसरून आज दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी हाय पावर कमिटीचा पाहणी दौरा पार पडला. 

या निमित्तानं प्रतिक्रिया देताना सर्व शेतकरी बांधवांनी विश्वास प्रकट केला की गेल्या दहा अकरा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न झपाट्याने मार्गी लावण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा पुढाकार कामी आला. अनेक दिवसापासून रेंगाळलेल्या या अत्यंत गंभीर प्रश्नाची उकल होत असताना आमदार प्राजक्त तनपुरेच्या प्रयत्नाने नवसंजीवनी मिळाल्याचं समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाल. परिसरातील नागरिकांकडून आमदार तनपुरे ह्यांच्या प्रयत्नाचे कौतुक होताना दिसत आहे. पिंपळगाव माळवी येथील रघुनाथ झिने सर ,रामनाथ झिने ,जालिंदर गुंड, मनोज लहारे, अप्पा जाधव,वडगाव गुप्ता येथील प्रकाश डोंगरे, जालिंदर डोंगरे ,सुभाष ढेपे ,कदम माऊली, शेवाळे सर, विजय डोंगरे व सर्व स्तरातून ग्रामस्थ आभार व्यक्त करत आहेत.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे