ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर उभारण्यासाठी चक्क दगडांवरच होणार ३ कोटींचा खर्च

भगवानगडावर ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर उभारण्यासाठी चक्क दगडांवरच होणार ३ कोटींचा खर्च
१००० वर्ष टिकावे असे असणार मंदिर;२०२६ पर्यंत होणार काम पूर्ण
ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांची अपार निष्ठा संत ज्ञानेश्वर माऊली महाराज व त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथावर होती त्याच भगवान गडावर संत ज्ञानेश्वरांचे भव्य दिव्य मंदिर उभारण्यासाठी महंत न्यायाचार्य डॉ . नामदेव महाराज शास्त्री यांनी पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे या मंदिरासाठी लागणा-या काळ्या कुळकुळीत शिळेचा देगलूर , नांदेड ते भगवानगड असा प्रवास अचंबित करीत आहे . अयोध्येच्या राम मंदिरासाठी येत असलेल्या शिळेपाठोपाठ आता भगवानगडावर येणाऱ्या विशाल शिळेची चर्चा सर्वदूर होत आहे
भगवानगडावरील या संकल्पित मंदिरासाठी तब्बल पंचवीस कोटींचा खर्च लागणार आहे भगवान गडाचे संस्थापक संत भगवान बाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वर , ज्ञानेश्वरीवर प्रेम केले . धर्म कार्य करीत असताना समाजकार्यदेखील केले . शिक्षणावर भर देत गरिबांच्या मुलांसाठी वस्तिगृह ही संकल्पना सुरू केली . त्यातून हजारो विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी घडले.अंधश्रध्दा , पशुहत्या व्यसनमुक्तीसारखे काम करून मोठी क्रांती करीत गडाची धर्मध्वजा बंदी , फडकवत ठेवली . तीच परंपरा पुढे त्यांचे उत्तराधिकारी भीमसिंह महाराज घडवण्याचे काम सुरू ठेवले . अन्नदान , ज्ञानदान हा केंद्रबिंदू मानत हा दानयज्ञ तेवत ठेवला आहे . भगवान बाबांची जशी संत ज्ञानेश्वर महाराजांवर श्रध्दा होती तशीच श्रध्दा आणि विश्वास शास्त्रीजींची आहे . म्हणूनच संत ज्ञानेश्वरांचे भव्यदिव्य अशा मंदिराचे काम पूर्ण करण्यासाठी थेट देगलूर वरून हा दगड आणला जात आहे.2026 पर्यंत या मंदिराचे काम पूर्ण होणार असून या मंदिराचे आयुष्य 1000 वर्ष टिकावे अशा पध्दतीने या मंदिराची बांधणी होणार आहे.
दगडांवर होणार तीन कोटींचा खर्च
दोन दिवसांपूर्वी आलेल्या एका दगडाचे वजन २५ टन असल्याचे सांगितले जाते संपूर्ण मंदिरासाठी तीन कोटी रुपयांचा दगडावर खर्च होणार आहे या दगडांना कोरीव नक्षीदार आकार देणे , मंदिर उभारणीचे काम पाहता हे मंदिर अति भव्य दिव्य असणार आहे भगवानगडावर बाबांच्या समाधी दर्शनाबरोबरच विठ्ठलाचे आणि माऊली ज्ञानेश्वरांचे भाविकांना दर्शन होणार आहे .