भोकर शिवारात रात्री झालेल्या अपघातात चालकाचा मृत्य

भोकर शिवारात रात्री झालेल्या अपघातात चालकाचा मृत्य
टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुक्यातील भोकर महानुभव आश्रमा जवळ
टेम्पो झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागी मृत्यू तर या टेम्पो दोन महिला बचावल्या आहेत.अपघातग्रस्त टेम्पो समोरून झाडावर जोराने धडकल्याने त्या मोठ्या प्रमाणावरून नुकसान झाले
दि.२९ जानेवारीच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास श्रीरामपूर कडे एम एच १६ ९९५२ हा विटाची राख घेवून श्रीरामपूरकडे घालेला असताना भोकर शिवारात असलेल्या वैष्णसेवाश्रमाजवळील राज्य मार्गालगतच्या झाडाला आदळ झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर या टेम्पोत असलेल्या दोन महिला अपघात त्यातून बचावले आहे. त्या महिला कोण होत्या व कुठल्या होत्या? हे समजू शकले नाही. या टेम्पोने राज्य मार्गाच्या झाडाला इतक्या जोराची धडक दिली की त्या टेम्पोच्या काही पार्ट टेम्पोच्या पुढे पडले होते. त्याचबरोबर या टेम्पोतील राख टेम्पोच्या पुढे सुमारे चाळीस फूट फुटापर्यंत लांब उडाली होती,
. हा अपघात झाल्याचे समजताच तालुका पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. ज्ञानेश्वर लागणार आहे. थोरात यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक संजय निकम व अतुल बोरसे से पो.ना. अनिल, पो.हे.काँ. चाँद पठाण, पोलीस पाटील बाबासाहेब , बाबा सय्यद हे दुर्घटनास्थळी दाखल झाले ,
राज्यमार्गावरील वाहतूक सुरळीत रात्री उशीरापर्यंत त्या टेम्पोत अडकलेला चालकाचा मृतदेह
काढण्याचा प्रयत्न करत होते. हा टेम्पो नायगाव येथील सुनिल लांडे यांचा असून चालक सचीन रोकडे हा अकराबाद येथील असून तालुका पोलीसांनी रात्री उशीराने टेम्पोचालकाचा मृतदेह टेम्पोतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे रवाना करण्यात आला पुढील तपास साई फौजदार शरद गायमुखे करीत आहे,