
टाकळीभान घर टू घर लसीकरण मोहीम चांगला प्रतिसाद -तहसीलदार प्रशांत पाटील
कोरोना तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, टाकळीभान येते घर टू घर लसीकरण मोहीम तहसीलदार प्रशांत पाटील व गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस, व वैद्यकीय अधिकारी राम बोर्डे, उपसरपंच कानोबा खंडागळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत टाकळीभान लक्ष्मीवाडी परिसरात लसीकरणाची घर टू घर मोहीम राबविण्यात आली आहे ,
याप्रसंगी तहसीलदार प्रशांत पाटील, यांनी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले , नागरिकांना समजून सांगून , लस्सी घेण्यासंदर्भात प्रवृत्त केले, त्यामुळे वयाच्या 80 वर्षाच्या वयोवृद्ध आजीबाईने लस घेतली, हे पाहून सर्व नागरिक लस घेण्यासाठी, स्वयंपुर्तीना पुढे येत होती ,आपण लवकरच शंभर टक्के लसीकरण पूर्ण करू , पाटील म्हणाले
यावेळी सरपंच अर्चना रणवरे ,तंटामुक्तीचे उप अध्यक्ष विलास सपकाळ, ग्रा,पा, सदस्य अर्चना पवार ग्राम विकास अधिकारी आर एफ जाधव ,वंदना तोरणे, मनिषा भोसले ,आशा वर्कर आशा शिरसाट ,मंगल खरात ,भाऊसाहेब चांदणे तलाठी सहाय्यक संदीप जाधव ,कोतवाल सदा रणवरे , अप्पासाहेब रणवरे आदी उपस्थित होते
Rate this post