
जि.प. शाळा उक्कलगाव येथे बाल आनंद मेळावा
श्रीरामपूर तालुक्यातील जि.प. शाळा उक्कलगाव येथे बाल आनंद मेळावा निमित्त भाजी बाजार भरविण्यात आला होता. यावेळी बाल व्यापाऱ्यांनी फळे, खाद्यपदार्थ, भाजीपाला, फळ भाजी, चॉकलेट व इतर मिठाईची दुकाने थाटली होती.
या बाल बाजारास उक्कलगावचे सरपंच नितीन थोरात, ग्राम पंचायत सदस्य विजय पारखे, रविंद्र थोरात , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तनुजा अभंग , दत्तात्रय पावसे, केशव तावरे, ज्ञानेश्वर तावरे, शालिनी भागवत, रुपाली मोरे, आदिनाथ जगधने,आश्विनी ताके, इब्राहीम सय्यद, प्रकाश नानासाहेब थोरात, आदि सह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या व या उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यभान वडितके, पुंजाहरी सुपेकर, मारूती वाघ, विनित चांदेकर, कविता गायकवाड, मनिषा धामणे, ज्योती तोरणे यांचे सह विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले. ग्रामस्थांनी बाल मेळावाचा बाजारचा आनंद लुटला,
Rate this post