गुन्हेगारी
घोडेगाव चौफुला येथे दारू पकडली दोन जनावर गुन्हा दाखल.

घोडेगाव चौफुला येथे दारू पकडली दोन जनावर गुन्हा दाखल.
सोनई / शनिवार दि 26 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान अहमदनगर कडून घोडेगाव चौफुला मार्ग चांद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर संतोष बाबुराव सात दिवे व अरुण साहेबराव वैरागर दोघे रा रस्तापुर तालुका नेवासा हे बजाज सिटी हंड्रेड कंपनीच्या मोटरसायकलवर बेकायदा दारूची वाहतूक करताना आढळून आले त्यांच्या ताब्यातून विविध कंपनीच्या 180 मिलीच्या 92 दारूच्या बाटल्या मोटर सायकल जप्त करण्यात आले त्याची किंमत बाजारभावाने 13 870 रुपये होत असून सोनई पोलिसांकडून सदर दारूच्या बाटल्या व बजाज कंपनीची सिटी हंड्रेड मोटरसायकल जप्त करण्यात आली याचा अधिक तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदर बाबत सोनई पोलीस ठाण्यात वरील दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे