अहमदनगर विभाग वरिष्ठ गट निवड चाचणी. – मयुर पटारे

कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी १५ जानेवारी रोजी टाकळीभान येथे अहमदनगर विभाग वरिष्ठ गट निवड चाचणी. – मयुर पटारे
लोकनेते माजी आ.भानुदासजी मुरकुटे साहेब यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन.
टाकळीभान (प्रतिनिधी): महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वरिष्ठ गट मुले या गटाच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा दि. २० ते २२ जानेवारी २०२३ रोजी अर्जुन नगर, जिल्हा कोल्हापूर येथे संपन्न होणार आहेत. ह्या स्पर्धेकरिता अहमदनगर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने विभागाच्या संघाची निवड चाचणी करण्यात येणार आहे. निवड चाचणीचा शुभारंभ लोकनेते माजी आ.भानुदास मुरकुटे साहेब यांच्या हस्ते होणार आहे.
निवड चाचणीसाठी सर्व खेळाडूंनी आपले आधार कार्ड सोबत आणायचे आहे. चाचणी दरम्यान चौदा खेळाडूंची निवड केल्या जाणार आहे. त्यानंतर दोन दिवसीय सराव सत्र आयोजित करून १९ जानेवारीला संघ स्पर्धेसाठी रवाना होईल अशी माहिती मयुर पटारे यांनी दिली.
तरी या स्पर्धेकरिता अहमदनगर विभाग वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धा रविवार दि.१५ जानेवारी २०२३ वार रोजी दुपारी ठीक १.०० वा. टाकळीभान, श्रीरामपूर येथे विक्रांत स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. तरी अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन अहमदनगर पासिंग व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव श्री पार्थ दोशी, विभागीय सचिव प्रा. दादासाहेब तुपे, राजेंद्र कोहकडे, गौरव डेंगळे, पापा शेख, नितीन बलराज, सुनील चोळके, सागर पटारे, स्वप्नील थोरात आदींनी केले. अधिक माहितीसाठी संपर्क नितीन बलराज- 7972689643
सागर पटारे- 8329058150 यांच्याशी संपर्क साधावा असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.