ज्ञान माऊली इंग्लिश मीडियम नाताळसन सण केला साजरा

ज्ञान माऊली इंग्लिश मीडियम नाताळसन सण केला साजरा
23/12/2022 रोजी सकाळी 9-12.00 ह्या वेळेत ज्ञानमाऊली इंग्लिश मिडीयम स्कूल, घोडेगाव ह्या ठिकाणी प्रभु येशु जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Jr.KG ते 9वी पर्यंतच्या मुलांनी त्यात सहभाग घेतला होता. त्यानी प्रभु जन्माविषयी एक संगीतमय नाटिका सादर केली. त्यात विविध नृत्य बसवून कार्यक्रमाची शोभा वाढविण्यास सर्व शिक्षक- शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी फार परिश्रम घेतले.
सर्व शिक्षक- शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या ख्रिसमस फ्रेंड्स ला विविध भेटवस्तू दिल्या. ज्ञानमाऊली स्कूल हायस्कूल च्या अंतर्गत राबवलेल्या ” Helping Hand”ह्या theme नुसार महात्मा फुले बालसंगोपन केंद्र घोडेगाव येथील अनाथ आश्रमाला भेट देऊन तेथील ४० मुलांना शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्व- खर्चातून भेटवस्तू, किराणा, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप देखील केले. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्रीयुत. काशिनाथ चौगुले ह्यांना शाळेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलावण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनीही एकमेकांना ख्रिसमस फ्रेंड अंतर्गत भेटवस्तू दिल्या व हा संपूर्ण आठवडा प्रार्थना करण्याचें आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. नजन राशीनकर मॅडम व श्रीयुत. कर्डिले सर ह्यांनी केले. अध्यक्ष स्थान श्रीयुत. बारगळ सर ह्यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी शाळेचे मॅनेजर फा. सतिश कदम तसेच शाळेचे मुख्याध्यापक फा. डॉमिनिक ब्राम्हणे हे उपस्थित होते.