आरोपींना तात्काळ अटक न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करणार आंदोलन…
आरपी आयच्या इशारा नंतर तात्काळ गुन्हा दाखल ...

आरपी आयच्या इशारा नंतर तात्काळ गुन्हा दाखल …
आरोपींना तात्काळ अटक न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करणार आंदोलन…
दि 14 एप्रिल रोजी दोन युवक आंबेडकर जयंती साठी दौंड कडे जात असताना बेलवंडी फाटा येथे दोन युवकांना काठी व लोखंडी रॉड ने बेदम अमानुष रित्या मारहाण करण्यात आलीहोती.
याबाबत अभिमन्यू पोपट साळवे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. की दि 14 एप्रिल रोजी अभिमन्यू पोपट साळवे व गौतम नवनाथ साळवे आम्ही दोघे रात्री अकरा वाजता अशोक लेलेण्ड दोस्त गाडी क्र.एम एच 16 सीडी 1313 ने चिखली मार्गे दौंड कडे जात असताना लघुशंकेसाठी बेलवंडी फाटा येथे थांबले असता,एका महिंद्रा पिकअप मधून 6 ते 7 अनोळखी इसम उतरले आणि त्यांनी विचारले की इथे काय करता चोरी करता काय? यावर आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साठी दौंड ला चाललो आहे परंतु या अनोळखी व्यक्तींनी लगेच जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने, व लोखंडी गजाने अभिमन्यू आणि गौतम यांना बेदम मारहाण केली.
सदर घटनेची माहिती मिळताच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे चे तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली असता मारहाण करणाऱ्यांनी अभिमन्यू आणि गौतम या दोघांना दौंड येथील रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची खोटी माहिती दिली , प्रत्यक्षात त्यांना बेलवंडी येथील एका ऑफिस मध्ये डांबून ठेवले होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी राजाभाऊ जगताप यांना समजले की त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत
अभिमन्यू पोपट साळवे याच्या हाताचे हाड मोडले असून ,हात मोडलेल्या स्थितीत त्याला एक रात्र डाबुंन ठेवून १५तारखेला श्रीगोंदा पोलीस स्टेशन ला दुपारी आणुन गुन्हा दाखल करून त्यानां अटक करून ठेवले होते. नंतर त्यांचा जामीन करण्यात आला .त्यानंतर राजाभाऊ जगताप यांनी आंदोलनाचा इशारा देताच बेलवंडी पोलीस स्टेशनने शनिवारी रात्री उशिरा अभिमन्यू व गौतम यांचा गुन्हा दाखल करून घेतला यामधील आरोपी
संजय शेळके, आकाश मोरे,पांडुरंग देवरे,गोविंद सावंत, विकास थोरात,साहेबराव गवळी,आनंद जगताप,विष्णू गर्दुळकर सर्व राहणार बेलवंडी स्टेशन कंट्रक्शन ऑफिस
शंकर रामचंद्र अर्थमूव्हर्स, प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नमूद गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटीचे कलम 3(1) (r), 3(1) (s) तसेच, भादवि कलम 323, 504, 506, 143, 147, 148, 149, 324 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत…
त्या दोघांना झालेल्या अमानवीय मारहाणीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जाहीर निषेध करत आहेत. तसेच गुन्हे दाखल झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी दिला.