उसाच्या डबल टेलर ट्रॅक्टर व अज्ञात वाहनाच्या धडकेत दूचाकीस्वार जागीच ठार.

उसाच्या डबल टेलर ट्रॅक्टर व अज्ञात वाहनाच्या धडकेत दूचाकीस्वार जागीच ठार.
नगर-मनमाड मार्गावरील राहुरी सूतगिरणी जवळील बाजार समिती पेट्रोल पंपासमोर उस वाहतूक करणाऱ्या डबल ट्रेलर ट्रॅक्टर व अज्ञात वाहनाच्या धडकेत बाभुळगाव येथील दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे.
बाभूळगाव येथील मंडप व्यावसायिक आबासाहेब बापूसाहेब ससाणे(वय-२८) हे मंगळवारी सकाळी दुचाकीवरून पूणतांबा येथे देवदर्शनासाठी पत्नी, सासू व भाच्या समवेत जात असताना सूतगिरणी जवळील बाजार समिती पेट्रोल पंपासमोर दुचाकीला डबल ट्रेलरचा कट बसून अज्ञात वाहनाची धडक बसली. यास अपघातात आबासाहेब बापूसाहेब ससाणे(वय-२८) जागीच ठार झाले. तर त्याची पत्नी अंजली ससाणे ही गंभीर जखमी झाली आहे.तर सासू मिराबाई वायदंडे व भाचा कार्तिक वायदंडे (रा.चांदेगाव, ता.राहुरी) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांवर राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी स्थानिक नागरिक, प्रवासी व शिवबा प्रतिष्ठाणचे रुग्णवाहिका चालक रवी ढोकणे, देवळालीच्या रुग्णवाहिकेचे रवी देवगिरे यांनी मदतकार्य केले. या अपघातात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया उशिरापर्यंत सुरू होती.
आठ दिवसात राहुरी सूतगिरणी परिसरातील तिसरा अपघात असून नगरच्या भिंगार येथील बाप-लेक व नातवास तसेच कोपरगाव येथील एका महिलेस आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांना अपंगत्वही आले.