अपघात
विजेचा शाँक लागुन शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

विजेचा शाँक लागुन शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू
विजेचा शाँक लागुन पंधरा वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला असुन या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे या बाबत समजलेली माहीती अशी की विशाल भागीनाथ पिटेकर हा पंधरा वर्ष वयाचा मुलगा जे टी एस हायस्कूल येथे इयत्ता नववीत शिकत होता त्याला अचानक विजेचा शाँक लागला तो लाबं फेकला गेला घरातील नातेवाईकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विजेची बटन बंद केली व त्यास तातडीने दवाखान्यात हलविले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले .
बेलापुर येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बेलापुर पोलीस स्टेशन समोरील संदीप ढोल पार्टीचे मालक नवनाथ धनवटे यांचा तो नातू होता आई वडीलांची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे नवनाथ धनवटे यांच्याकडे तो शिक्षण घेत होता.