महाराष्ट्र
टाकळीभान येथे संत तुकाराम महाराज बीज साजरी.

टाकळीभान येथे संत तुकाराम महाराज बीज साजरी.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील पुरातन श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात जगतगुरू श्री. संत तुकाराम महाराज बीज
पुष्पवृष्टी करून साजरी करण्यात आली.
मंदिरात सकाळी १०.३० ते १२ या दरम्यान भजन
करण्यात आले व बरोबर १२ वाजता पुष्पवृष्ठी करून
बीज साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी संत तुकाराम महाराजांचा जयजयकार केला.
तुकाराम बीज साजरी झाल्यावर मंदिराचे पुजारी
विजय देवळालकर यांचे हस्ते आरती करण्यात आली.
आरती नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी देवस्थानचे सचिव नानासाहेब लेलकर,
गोकुळ भालेराव, सुरेश बनकर, गोरक्षनाथ जाधव,
लहानभाऊ पवार, साहेबराव बोडखे, बाबासाहेब पवार
हनुमंत पटारे, प्रकाश काळे, भानुदास नवले, कडूबाळ
हिवाळे, मच्छिंद्र पंडीत, सदाशिव पटारे, अशोक गोड,
सुमन मुळे, लहानबाई बोडखे, सिताबाई गलांडे, वसुंधरा व मृणाल देवळालकर आदी भाविक उपस्थित
होते.
टाकळीभान— येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात
श्री. संत तुकाराम महाराज बीज साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांनी पुष्पवृष्ठी करून संत तुकाराम महाराजांचा जयजयकार केला.