अमीत गोरे यांचे एलआयसी एजंट म्हणून अल्पवयातील यश कौतुकास्पद- अशोकराव तुपे
श्री अमित गोरे यांचे एलआयसी एजंट म्हणून अल्पवयातील यश कौतुकास्पद
श्री अशोकराव तुपे
श्री अमित गोरे यांनी अल्पवयात एलआयसी एजंट म्हणून मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे यांची अमेरिका , बोस्टन येथे होणाऱ्या एम डी आर टी या पुरस्कारासाठी नुकतीच झालेली निवड अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन श्री संत सावता माळी युवा संघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री अशोकराव तुपे यांनी केले
अमित गोरे यांनी एलआयसी तील
एम डी आर टी हा सर्वोच्च सन्मान मिळवला त्याप्रसंगी त्यांचे सत्कार श्री संत सावता माळी युवा संघ यांच्यावतीने करण्यात आला यावेळी श्री अशोक तुपे बोलत होते
एल आय सी असोसिएट श्री अशोक गोरे म्हणाले की एलआयसी विमा धारकांचा विश्वास संपादन करून अमित गोरे यांनी अल्पावधीत मिळालेले यश हे त्यांच्या कष्टाचे फळ आहे .
याप्रसंगी अमित गोरे यांचे बंधू व गोरे डेंटल हॉस्पिटल चे संचालक डॉ सुदर्शन अ गोरे , डॉ केतन गोरे तसेच विमा प्रतिनिधी विजय बेल्हेकर उपस्थित होते
श्री अमित गोरे यांच्या निवडीने समाजामधून आनंद व्यक्त होत आहे तसेच समाजातील सर्व स्तरातील नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.
राहुरी तालुका
अशोक मंडलिक