राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी वैचारिक वारसा जपला पाहिजे. …………. शरद पवार

राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी वैचारिक वारसा जपला पाहिजे. …………. शरद पवार
टाकळीभान- प्रतिनिधी -राजकीय कार्यकर्त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. वाचन केले पाहिजे, वैचारिक वारसा जपला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व देशातील जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस व श्रीरामपूर पं.स. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी काल मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात शरद पवार यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली त्यावेळी श्री. पवार बोलत होते. प्रारंभी मुरकुटे दाम्पत्यांनी डॉ. वंदना मुरकुटे यांनी लिहिलेल्या “योगीराज गंगागिरी ते सद्गुरू नारायणगिरी महाराज” या पुस्तकाची प्रत श्री. पवार यांना दिली त्यावेळी त्यांनी सराला बेटाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती सवड काढून लिखाण करतात ही कौतुकाची बाब असल्याचे श्री. पवार म्हणाले. राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी राजकारण कमी व समाजकारण जास्त करावे, विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करून शब्दसंपदा वाढवावी. असे सांगितले.
श्रीरामपूर येथील श्रीमती. मीनाताई जगधने व स्व.माणिकराव जगधने यांच्या वाटचालीबाबत, अशोक कारखान्याच्या निवडणुकीबाबत, नवीन तंत्रज्ञान, राजकीय, कौटुंबिक विषयांवर यावेळी चर्चा झाली,