जश़्ने -ईद- ए- मिलादुन्नबी बेलापूरात उत्सहात साजरी

जश़्ने -ईद- ए- मिलादुन्नबी बेलापूरात उत्सहात साजरी
मुस्लीम धर्माचे संस्थापक मोहंम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात जश़्ने ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्सहात संपन्न झाली ईदगाह मैदान अ्लाउद्दीन बाबा चॉक पासून मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली मिरवणूक बेलापुरच्या मुख्य झेंडा चौकात येताच नागरीकांच्या वतीने जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड मा,सरपंच भरत साळूंके तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम आदिंनी केले या वेळी मिठाईचे वाटप करण्यात आले. तुळजा भवानी मंदीर चौकातही मिरवणूक आल्यानंतर तेथेही मुस्ली बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच खाऊचे वाटप करण्यात आले त्यानंतर मिरवणूक जामा मस्जिद येथे आली तेथे मिरवणूकीचे रुपांतर सभेत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामा मस्जिदचे मुख्य ट्रस्टी जाफरभाई आतार हे होते या वेळी विद्यार्थ्यांनी मोहंम्मद पैगंबर यांच्या जिवनावर भाषणे केली .या वेळी जिं प सदस्य शरद नवले ,जामा मस्जिदचे ट्रस्टी हाजी बहोद्दीन सय्यद सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे हाजी ईस्माईल शेख गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे पत्रकार देविदास देसाई भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रफुल्ल डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे नियोजनजामा मस्जिद ट्रस्ट व अंजुमन कमीटी बेलापुर यांनी केले होते कार्याक्रम यशस्वीतेसाठी मोहसीन बहोद्दीन सय्यद जब्बार आतार शफीक बागवान असीफ शेख शफीक आतार कौसर सय्यद जब्बार बागवाले अजीज शेख सर्फराज सय्यद जुबेर आतार कैफ काझी वसीम शेख समीर शेख सुलतान शेख मुख्तार सय्यद आदिंनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी ईस्माईल शेख यांनी केले तर सूत्रसंचलन मोहसीन सय्यद यांनी केले मुनीर बागवान यांनी आभार व्यक्त केले