गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
ग्रामपंचायत कार्यालय जवळील अतिक्रमण गाळा सात दिवसाच्या आत काढण्याचे तहसीलदारांचे आदेश…

टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालय जवळील अतिक्रमण गाळा सात दिवसाच्या आत काढण्याचे तहसीलदारांचे आदेश…
टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालय शेजारी चालू असलेले बांधकाम गट नंबर 250/1 मध्ये अंदाजे १५ फूट रुंद व 20 फुट लांब आरसीसी (गाळा) बांधकाम करून केलेले असून ,अतिक्रमण केलेले असले बाबत मंडळअधिकारी व तलाठी टाकळीभान यांनी संदर्भीय अहवाल तहसीलदार कडे सादर केला आहे. नोटीस मिळाली पासून सात दिवसाच्या आत स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा सदरचे अतिक्रमण निष्कासित करणेबाबत पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशा प्रकारची नोटीस श्रीरामपूरचे कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार यांनी प्रारित केली असून, सदर नोटीस अतिक्रमण धारक गणेश रमेश नागले यांच्या नावे काढली आहे.