बेलापुर विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही जिल्ह्यात अव्वल

बेलापुर विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही जिल्ह्यात अव्वल
श्रीरामपुर तालुक्यात बेलापुर विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही जिल्ह्यात अव्वल नंबरची सोसायटी ठरली असुन या संस्थेच्या संचालक मंडळाने १५%लाभांश १०किलो साखर दिवाळीचा फराळ देण्याचा निर्णय घेतला असुन सभासद हीत जोपासतानाच संस्थेचा विकास साधण्याचाही प्रयत्न केला आहे असे गौरोद़्गार आमदार लहु कानडे यांनी काढले दिपावली निमित्त बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या सभासदांना १५ टक्के डीव्हीडंट १० किलो साखर तसेच फराळ वाटप व सेवकांना बोनस वाटपाच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक भगवान सोनवणे अजय डाकले कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळूंके राजेश खटोड दत्ता कुऱ्हे आदि मान्यवर उपस्थित होते आमदार लहु कानडे पुढे म्हणाले की सध्याच्या शासनाने सर्वांनाच गाजर दाखविण्याचे काम केले आहे महाविकास अघाडी सरकारने अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले होते त्यांना तिलांजली देण्याचे काम या शासनाने सुरु केले आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी भुईसपाट झाला आहे त्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली पाहीजे शेती कायमच तोट्यात चालल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम जिल्हा बँकेने हाती घेतले आहे शेतकऱ्यांना विज व पाणी हे महत्वाचे आहे हे लक्षात घेवुन शेतकऱ्यांना विंजेसंदर्भात येणाऱ्या अडचणीचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की श्रीरामपुर तालुक्यात उच्च दाबाने विज पुरवठा व्हावा अशी यंत्रणाच अस्तित्वात नाही त्यामुळे तालुक्यात हाय पाँवर सब स्टेशन मंजुर करण्यात आले असुन लवकरच त्याचे काम सुरु होणार आहे ,तालुक्याचा शाश्वत स्वरुपात विकास व्हावा हे आपले स्वप्न आहे श्रीरामपुर ते देवळाली या रस्ता चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असुन चांगल्या कामांना खिळ घालणाऱ्या अपप्रवृत्ती विरोधात भक्कमपणे उभे राहीले पाहीजे असेही ते म्हणाले जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे म्हणाले की जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप देण्यासाठी कर्ज योजना सुरु करण्यात आली असुन त्याचा लाभ घ्यावा असे अवाहन ससाणे यांनी केले या वेळी बोलताना संस्थेचे चेअरमन सुधीर नवले म्हणाले की केवळ कर्ज देणे व वसुल करणे या वर अवलंबून न रहाता संस्थेने पेट्रोल पंप स्वस्त धान्य दुकान खत डेपो असे दुय्यम व्यवसाय सुरु केल्यामुळे संस्था नफ्यात आलेली आहे सन २०१४ पासुन सभासदांना लाभांश देण्याचे काम संस्था करत आहे १५ वर्षापासुन संस्थेचा कारभार काटकसरीने केल्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा संस्था आमच्या ताब्यात दिली आहे त्यांच्या विश्वासाला तडा जावु दिला जाणार नाही आगामी काळात शाँपींग काँम्प्लेक्स मंगल कार्यालाय बांधण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही नवले म्हणाले आमदार कानडे यांनी श्रीरामपुर ते देवळाली या रस्ता चौपदरीकरण कामाकरीता सोळा कोटीचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल तसेच गावातील स्मशानभुमी दलीत वस्ती वाबळे वस्ती करीता निधी दिल्याबद्दलही त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला या वेळी त्रिंबकराव कुऱ्हे नंदकिशोर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले तुकाराम मेहेत्रे शेषराव पवार अनिल नाईक अंतोन अमोलीक प्रदीप शेलार अयाज सय्यद जाकीर शेख प्रविण शेलार सुनिल नाईक उत्तम मेहेत्रे रावसाहेब कुऱ्हे राजेंद्र सातभाई अशोक कुऱ्हे विश्वनाथ गवते आदिसह सभासद मोठ्या सख्येंने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास मेहेत्रे यांनी केले तर सचिव विजय खंडागळे यानी आभार मानले