क्रिडा व मनोरंजन
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन संघासाठी, गणेश रणवरे ,व गणेश पवार, यांची संघात निवड,

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन संघासाठी, गणेश रणवरे ,व गणेश पवार, यांची संघात निवड,
टाकळीभान येथील गणेश रणवरे व भोकर येथील गणेश पवार त्यांची, बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन 48 कुमार /कुमारी गट राज्य अजिंक्यपदी निवड चाचणी ,कबड्डी स्पर्धेसाठी ,अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संघामध्ये, आझाद क्रीडा मंडळ टाकळीभान, संघातून खेळाडू गणेश रणवरे, व जगदंबा क्रीडा मंडळ भोकर या संघातील खेळाडूं गणेश पवार ,यांची अहमदनगर जिल्हा संघातून निवड झाली आहे,
खेळाडू रणवरे व पवार यांना सुनील गाडेकर सर , भाऊराव सुडके सर रवी गाढे सर अक्षय मांजरे ,महेश कोल्हे, रियाज पठाण, आदींनी योग्य मार्गदर्शन केले, या निवडीबद्दल ‘ताई’ प्रतिष्ठान ( कानोबा खंडागळे मित्र मंडळ)टाकळीभान भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे, टाकळीभान व भोकर ग्रामस्थांनी अभिनंदन केले,