महात्मा फुले कृषी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी*
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणावे*

*महात्मा फुले कृषी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी*
*छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणावे*
*- कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील*
महात्मा फुले कृषी विद्यापीठात शिवजयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रमोद रसाळ, नियंत्रक श्री. सुखदेव बलमे, विभाग प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे, डॉ. के. जे. कांबळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान , क्रीडा अधिकारी प्रा.दिलीप गायकवाड, प्रसारण अधिकारी डॉ.पंडित खर्डे, डॉ.पवन कुलवाल,सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे उपस्थित होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विचार मांडताना कुलगुरू डॉ.पी. जी. पाटील म्हणाले स्वराज्य स्थापनेसाठी महाराजांना जिजाउंचे बाळकडू मिळाले.त्यांच्या सैन्यात सर्व जाती, धर्मातले लोक होते.प्रचंड इच्छाशक्ती आणि गनिमी कावाचा वापर करत त्यांनी स्वराज्याचा झेंडा अटकेपार नेला.महाराजांच्या याच गनिमी काव्याचा वापर वियतनाम देशाने करून अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला वीस वर्ष झुंजविले.रयतेच्या राजा,लोक कल्याणकारी राजा आणि एक आदर्श राजा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलू होते.शेतकऱ्यांविषयी त्यांना विशेष जिव्हाळा होता.अशा या थोर व्यक्तिमत्त्वाचे विचार आपण आचरणात आनावे असे आवाहन कुलगुरू डॉ.पाटील यांनी केले.याप्रसंगी अधिष्ठाता (कृषी) डॉ.प्रमोद रसाळ, डॉ.महावीरसिंग चव्हाण चौहाण, डॉ.पंडित खर्डे आणि विद्यार्थी यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाला शास्त्रज्ञ आणि कर्मचारी उपस्थित होते.