दोन दिवसापासून कामगारांचा कंपनीच्या गेटवर ठिय्या बुऱ्हानगर कंपनीतून मशिनरी हलवण्यास विरोध

दोन दिवसापासून कामगारांचा कंपनीच्या गेटवर ठिय्या
बुऱ्हानगर कंपनीतून मशिनरी हलवण्यास विरोध
नगर -येथील बुर्हानगर मधील फोर्स अप्लायन्स कंपनीमध्ये कंपनीने कंपनीतील मशिनरी हलवण्यास सुरुवात केल्याने कामगारांनी गेटवर ठिय्या दिला आहे व कुठल्याही परिस्थितीत असताना मशिनरी हलवून दिली जाणार नाही असे नगर जिल्हा मजदूर सेना च्या वतीने सांगण्यात आले आहे
येथील कामगार ३२ वर्षापासून कंपनीमध्ये काम करत आहे (पूर्वाश्रमीची व्हिडीओकॉन) त्यांना मार्च 20 18 पासून पगार मिळाला नाही त्यासाठी कामगारांनी औद्योगिक न्यायालयामध्ये केस दाखल केली आहे व सध्या ती चालू आहे. 22 मार्च 20 20 पासून कामगार कोरोना लॉकडाऊन असल्यामुळे घरी होते कंपनीने अधिकृतरित्या बंदची नोटीस लावली नाही आज आम्ही कंपनीत आलो आहोत तरी आम्हाला कंपनी गेटच्या आत मध्ये घेत नाहीत व येथील मशीनरी हलवत आहेत ,कोर्ट ऑर्डर असुनसुद्धा कंपनी मटेरियल गेटच्या बाहेर घेऊन जात आहे याला आमचा विरोध आहे आम्हाला आमचा आज पर्यंतचा पगार कंपनीने द्यावा त्यासाठी आमचे ठिय्या आंदोलन चालू आहे
या आंदोलनात नगर जिल्हा मजदूर सेनाच्या मार्गदर्शनाखाली कामगार अनिल गादिया, सुनिता थोरात ,सुनिता लोखंडे ,सुनीता चक्रे, विद्या पवार, शैला रासने ,सपना भिंगारदिवे, आरती बागडे ,अलका सोनवणे ,विजया धुमाळ बीजाला लांडे या टप्प्याटप्प्याने 24 तास तेथे पहारा देत आहे कंपनीत ३० च्या वर कामगार आहेत जर कंपनीने बळजबरीने मशिनरी व मटेरियल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यापुढे आडवे पडू असे त्यांनी सांगितले शनिवारी सकाळी दोन कंटेनर मध्ये कंपनीने मशिनरी व मटेरियल भरलेले आहे तेव्हापासून कामगार येथे खडा पहारा देत आहे
बुर्हानगर मधील फोर्स अप्लायन्स कंपनीमध्ये कंपनीने कंपनीतील मशिनरी हलवण्यास सुरुवात केल्याने कामगारांनी गेटवर ठिय्या दिला आहे फोटोत कामगार व ट्रक मध्ये भरलेल्या मशिनरी दिसत आहेत