नागरीकांचे हाल पाहुन महेबुब शेख यांनी स्वः खर्चातुन केला रस्ता दुरुस्त

नागरीकांचे हाल पाहुन महेबुब शेख यांनी स्वः खर्चातुन केला रस्ता दुरुस्त
संक्रापुर तालुका राहुरी येथील लांडेवाडी ते देवळाली चिंचोली फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संक्रापुर सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांनी स्वःखर्चाने केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला संक्रापुर ग्रामस्थांना राहुरी, देवळालीला जाण्याकरीता लांडेवाडी ते चिंचोली देवळाली हाच ऐकमेव रस्ता आहे मात्र पावसामुळे या रास्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली होती या रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले होते या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत शासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला होता परंतु शासन स्तरावर काहीच हालचाल झाली नाही संक्रापुर सहकारी संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांना या रस्त्याने जाणाऱ्या नागरीकांचे हाल पहावेना मग त्यांनी पदरमोड करुन या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला लांडेवाडी ते चिंचोली देवळाली फाटा या एक किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती स्वखर्चाने करुन नागरीकांची गैरसोय दुर केली त्याबद्दल संस्थेचे संचालक जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला या वेळी संस्थेचे माजी चेअरमन नबाजी जगताप संजय जगताप कल्याणराव होन भरतरीनाथ सालबंदे बाजीराव जगताप त्रींबक गताप विजय रोकडेकुंडलीक खेमनर बाळासाहेब गुंड भाऊसाहेब जगताप बबन खेमनर राजेंद्र जगताप रोहीदास खपके सुभाष दाते बाळासाहेब जगताप डाँक्टर सुरेश जगताप दावल शेख आदि ग्रामस्थ उपस्थित होते