जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप

जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप
बुलडाणा :१४ मार्च २०२३ पासून राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शन या प्रमुख मुद्द्यासह अन्य काही मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक दिली असून या संपात जवळपास सर्व संघटना सहभागी आहेत. महाराष्ट्राचे जुनी पेन्शन हक्क संघटन यामध्ये सक्रिय सहभागी असून जो पर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार…
अभी नही तो कभी नही…
_इतिहासामध्ये पहिल्यांदाच शिक्षकांसह सर्वच कर्मचारी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी आहेत._
*संपाचा आज तिसरा दिवस*
बुलढाणा जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षकांसह सर्वच संवर्गातील जवळजवळ सर्व कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले आहेत…
जुनी पेन्शनसह इतर अनेक जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.. आपल्या या रास्त मागण्या शासनाकडून आपण निश्चितपणाने पदरात पाडून घेऊ असाच विश्वास आज प्रत्येकाला वाटत आहे.
आता काहीही झालं तरी मागे हटायचं नाही असाच निर्धार प्रत्येकाने आज केला आहे..
*आपल्यावर कारवाई करणारे अधिकारी सुद्धा आपल्या सोबत आहेत..*
मग आपल्याला घाबरण्याचे काय कारण ?
आपले संघटन, आपली एकी हीच आपली ताकद आहे ..
जर शासन २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जर जुनी पेन्शन योजना लागू करत नसेल तर २००५ नंतर निवडून आलेल्या आमदार खासदार यांचेही पेन्शन बंद करून सर्वांसाठी समान न्याय आणि समान कायदा अस्तित्वात आणायला हवा .
शासनाचे नवनवीन येणारी अनेक धोरणे कर्मचाऱ्यांसाठी घातक आहेत..
याला जर आपल्याला हाणून पाडायचे असेल तर आपल्या एकीशिवाय पर्याय नाही..
अशीच एकी आपण अबाधित ठेऊयात..
आणि अशीच आपल्या एकीची जर वज्रमुठ असेल तर आपल्याला कोणालाही घाबरण्याचे काहीही कारण नाही..
संविधानिक मार्गाने आपल्या मागण्या शासनाकडे मांडणे व त्या पूर्ण करून घेणे हा आपला हक्क आहे..सदर बुलडाणा शासकीय -निमशासकिय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संपात उपस्थित विद्यमान शिक्षक संदेश कुऱ्हाडे , संतोष चवंड, अशोक बोराळकर ,दिलीप गवई, नितीन चव्हाण, गजानन वाघमारे यासर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले ,शासन आमची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत बेमुदत संप आहे ,असेही मुलाखती दरम्यान सांगण्यात आले आहे
आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण ठाम राहुयात…
एकच मिशन जुनी पेन्शन…