अध्यक्ष पदासाठी निवडणूक तर उपाध्यक्ष निवड मात्र बिनविरोध

अध्यक्ष पदासाठी निवडणूक तर उपाध्यक्ष निवड मात्र बिनविरोध
म्हसे सोसायटीच्या अध्यक्षपदी दादा देविकर ; उपाध्यक्षपदी प्रफुल्ल देविकर बिनविरोध
म्हसे ( ता. श्रीगोंदा ) येथील म्हसे विविध विकास सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली तर उपाध्यक्ष पदाची निवड मात्र बिनविरोध झाली. अध्यक्षपदी दादा देविकर यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी प्रफुल्ल देविकर यांची बिनविरोध निवड झाली.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड देत विरोधकांनी तेरा पैकी आठ जागांवर विजय मिळवत बाजी मारली. त्यानंतर सोमवार दि. ११ जुलै रोजी श्रीगोंदा येथे उपनिबंधक कार्यालयात पदाधिकारी निवड कार्यक्रम पार पडला. यामधे अध्यक्ष पदासाठी दोन्ही बाजूने अर्ज भरण्यात आले. तर उपाध्यक्ष पदासाठीची निवड मात्र बिनविरोध झाली. यावेळी माजी आमदार राहूल जगताप व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे गटाच्या बाजूने अध्यक्ष पदासाठी दादा शिवराम देविकर यांची मच्छिंद्र खेडकर यांनी सूचना मांडली. तर दिगंबर देविकर यांनी अनुमोदन दिले. तसेच आमदार बबनराव पाचपुते गटाच्या बाजूने अध्यक्ष पदासाठी दादा सुदाम देविकर यांची इंद्रभान खेडकर यांनी सूचना मांडली. तर राहूल पठारे यांनी अनुमोदन दिले. यामधे जगताप – नागवडे गटाच्या बाजूचे दादा देविकर यांची तेरा पैकी आठ मते मिळवत अध्यक्ष पदी निवड झाली. तसेच उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज असलेल्या प्रफुल्ल राघू देविकर यांची दत्तात्रय भोसले यांनी सूचना मांडली. तर जनाबाई लभडे यांनी सर्वानुमते अनुमोदन देताच त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आर.एस. चाबुकस्वार यांनी जाहिर केले. सचिव भास्कर रासकर यांनी सहकार्य केले.
निवडीनंतर नवनिर्वाचितांची सवादय मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच रामदास भोसले, लक्ष्मण देविकर, संभाजी देविकर, संतोष देविकर, संतोष कातोरे, मारुती हार्दे, गोरख देविकर, वाल्मिक खेडकर, रामदास देविकर, विलास देविकर, बाळासाहेब देविकर आदींसह सर्व संचालक, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
म्हसे ( ता. श्रीगोंदा ) येथे सहकारी संस्थेच्या बिनविरोध पदाधिकारी निवडी नंतर नुतन पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ