आदिवासी समाजाच्या मागण्या साठी खुलताबाद तहसीलदार यांना निवेदन.
खुलताबाद तालुक्यातील अनेक गावांतील आदिवासी समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी नही एखादी आदिवासी व्यक्ती मयत झाली तर अंत्यविधी कोठे करावा हा प्रश्न उपस्थित होते.याचेच एक उदाहरण सखासार वस्ती येथे स्मशानभूमी नसल्याकारणाने आदिवासींना नाईलाजाने रस्त्याच्या कडेला अंत्यविधी करावा लागत आहे हि अत्यंत लाजीरवाणी बाब आहे त्याच प्रमाणे खुलताबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये हिच परिस्थिती आहे सखासार वस्ती बरोबर या सर्व गावांना स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे त्याचप्रमाणे आदिवासी राहत असलेल्या जागा नावे करून देण्यात यावी तसेच शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय भूखंडावरील जागा उपलब्ध करुन देण्यात यावी आदिवासी मच्छिमार सोसायटी मध्ये. ८० टक्के प्राधन्य देण्यात यावे आदिवासी यांना जातप्रमाणपत्र वरील जाचक अटी शिथिल करून जात प्रमाणपत्र देण्यात यावी या अशा विविध मागण्या साठी आदिवासी जनता दल संस्थापक शिवदास पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुका कार्य अध्यक्ष विलास माळी यांच्या वतीने देण्यात आले या वेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज उपस्थित होता
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.