अपघात
*दुर्दैवी घटना; डॉक्टरचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेला एक एनडीआरएफचा जवान बेपत्ता*

*दुर्दैवी घटना; डॉक्टरचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेला एक एनडीआरएफचा जवान बेपत्ता*
डॉ. फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी परळी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करुन असून त्यांना मदत करण्यासाठी कोल्हापुर येथील एनडीआरएफचे पथक आले होते. या टिमचे शोध कार्य सुरु असताना यातील जवान राजू मोरे व शुभम काटकर हे पाण्यात अडकले होते. यातील जवान शुभम काटकर यांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. परंतू यातील जवान राजू मोरे यांना मात्र बाहेर काढण्यात अपयश आले असून त्यांचा शोध सुरु आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, मुख्याधिकारी विशाल भोसले, माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित आहेत. यासह परिसरातील नागरीकांनी याठिकाणी गर्दी केली आहे.