*मानोरी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी साहेबराव तोडमल*

*मानोरी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी साहेबराव तोडमल*
राहुरीत तालुक्यातील मानोरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदी साहेबराव तोडमल सर यांची निवड करण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते हि निवड करण्यात आली.
लोकनियुक्त सरपंच आब्बास शेख दयावान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत अध्यक्ष पदी साहेबराव तोडमल सर याच्या नावाची सुचना दादासाहेब पाटील आढाव
यांनी मांडली त्यास टाळ्यांच्या गजरात सर्वानुमते अनुमोदन दिले.सभेचे कामकाज ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड भाऊसाहेब यांनी पाहीले. नवनिर्वाचित अध्यक्ष साहेबराव तोडमल सर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी तोडमल म्हणाले की, या पदाच्या माध्यमातून गावातील गट-तट राजकारण न बघता सर्वांना योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील. ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. व तसेच गाव तंटामुक्त करून शासकीय योजनेचा लाभ मिळून देण्याचा प्रयत्न करू असे यावेळी सांगण्यात आले
याप्रसंगी उपसरपंच शकुंतला आढाव, संचालक उत्तमराव आढाव, दगडू पोटे, निवृत्ती आढाव,बाळासाहेब आढाव, माधवराव आढाव,कचरू आढाव, चेअरमन शरद पोटे, पोलीस पाटील भाऊराव आढाव, अण्णासाहेब तोडमल, संजय पोटे शामराव आढाव, शिवाजी थोरात, पोपटराव पोटे, बापूसाहेब वाघ, भाऊसाहेब आढाव, दादासाहेब आढाव, बाबा आढाव, कैलास आढाव, नवनाथ थोरात, रायभान आढाव, संजय डोंगरे, विकास वाघ, मनोज खुळे, दीपक खुळे, मधुकर भिंगारे, पोपट थोरात, , पिरखा पठाण, दिलावर पठाण, राजू पठाण, बाबुराव मकासरे, सुनील पोटे, अर्जुन पोटे, गोरख खुळे, रवींद्र निवृत्ती आढाव, भास्कर भिंगारे, बापूसाहेब आढाव, निलेश पोटे, सतीश पोटे, भाऊराव पोटे, देविदास वाघ, अभिषेक आढाव, नामदेव आढाव, हरिभाऊ आढाव, नानासाहेब तनपुरे, चांद शेख, लतीफ पठाण, दत्तात्रेय आढाव, दिलीप आढाव, चंद्रभान बाचकर, सुभाष वाघ, बापूसाहेब डोंगरे, अण्णासाहेब ठुबे, संतोष कळमकर, चंद्रकांत थोरात, सचिव काळे, ज्ञानदेव शेळके, चंद्रकांत पोटे, गोरक्षनाथ गुंड, योगेश आढाव,बालू भिंगारे आदिंसह अंगणवाडी सेविका,कृषी सहाय्यक, ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.