मानोरी येथे एक तास राष्ट्रवादीसाठी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

मानोरी येथे एक तास राष्ट्रवादीसाठी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
मानोरी प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील मानोरी येथे शनिवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता लक्ष्मी माता मंदिर येथे एक तास राष्ट्रवादीसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानोरी सोसायटीचे माजी चेअरमन लतीफ भाई पठाण हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी कार्यकर्त्यांच्या अड अडचणी जाणून घेण्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याची संकल्पना राबविण्यात येत आहे राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या सूचनेनुसार मानोरी मध्ये हा मेळावा संपन्न झाला अडीच वर्षांमध्ये आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या माध्यमातून
मानोरी गावांमध्ये भरीव कामे करण्यात आली मानोरी ते गणपत वाडी डांबरीकरण रस्ता एक कोटी अकरा लक्ष ठुबे वस्ती ते पठाण वस्ती खडीकरण 20 लक्ष मुस्लिम कब्रस्तान वॉल कंपाऊंड दहा लक्ष मानोरी परिसरामध्ये वीज प्रश्न बाबत दहा नवीन शंभर हॉर्स पॉवर च्या डीपी बसविण्यात आल्या तसेच मानोरी खिळे वस्ती रस्ता डांबरीकरण यासाठी दोन कोटी 49 लक्ष मंजूर झाले असून ते काम आत्ता प्रगतीपथावर सुरू आहे असे या मेळाव्या प्रसंगी राहुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव व तसेच भाऊसाहेब आढाव यांच्याकडून सांगण्यात आले तसेच गावातील अजून काही प्रश्न प्रलंबित असून त्यावर उपस्थित कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले ते प्रश्न आपण आमदार प्राजक्ता दादा तनपुरे यांच्याकडून लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करू असे यावेळी सांगण्यात आले याप्रसंगी राहुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव सर सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आढाव मानोरी सोसायटीचे संचालक नवनाथ थोरात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संपर्कप्रमुख बाबासाहेब आढाव एडवोकेट पैलवान संजय पवार
गोकुळदास आढाव सर विलास थोरात डॉक्टर बाबा आढाव यांची भाषणे झाली याप्रसंगी भाऊसाहेब आढाव यांनी आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांचा अभिनंदनचा ठराव मांडला त्याला सर्व उपस्थितांकडून वर हात करून प्रतिसाद देण्यात आला
यावेळी उपस्थित डॉक्टर राजेंद्र पोटे पाणी वापर सोसायटीचे संचालक बाळासाहेब पोटे मानोरी सोसायटीचे संचालक बाबा देव काळे संचालक दत्तात्रय आढाव तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष बाबासाहेब आढाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महिंद्रा आढाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच बाळासाहेब आढाव माजी चेअरमन दादासाहेब आढाव डॉक्टर बाबा आढाव दादासाहेब चोथे अनिल जाधव रावसाहेब चुलबरे गोरक्षनाथ थोरात सोमनाथ ठुबे कृष्णा कारंडे शंकर बाचकर दिलीप आढाव भारत आढाव बापूसाहेब आढाव अमोल तनपुरे सागर नेहे बापूसाहेब थोरात नवनाथ शिंदे अनिल ठुबे रवी जाधव अमोल थोरात भारत थोरात राजेंद्र आढाव महेश आढाव सुरेश पोटे अंबादास आढाव पुंडलिक काळे गणेश आढाव हे होते