बेलापुर पोलीस स्टेशनला आली एस आर के इंग्लिश मिडीयम स्कूलच्या लहानग्यांची सहल

बेलापुर पोलीस स्टेशनला आली एस आर के इंग्लिश मिडीयम स्कूलच्या लहानग्यांची सहल
बेलापुर (प्रतिनिधी )- पोलीस दादा विषयी असलेले कुतुहल, गैरसमज , कामाची पध्दत हे बालवयातच मुलांना सांगून त्यांच्या मनात असलेली भिती, शंका दुर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सहलीमुळे अनेकांच्या शंका तर दुर झाल्याच पण काही लहानग्यांच्या प्रश्नामुळे पोलीसदादाही अचंबित झाले. बेलापूरातील एस आर के ईंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने” चला पोलीस दादाशी करु या मैत्री ,गुन्हेगारी करु या हद्दपार “या उपक्रमांतर्गत बेलापुर पोलीस स्टेशन येथे विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी विद्यार्थ्यांनी साहेब आम्हांला पण तुमच्यासारखे पोलीस अधिकारी व्हायचंय….असे सांगताच चांगला आभ्यास करा भरपुर व्यायाम करा ज्ञान व शरीरयष्ठी हे दोन्हीही कमवा पोलीस गुन्हेगारांचे शत्रू आणि चांगल्या नागरिकांचे मित्र असतात, पोलीसांकडे नागरिकांची पाहण्याची दृष्टी वेगळी असली तरीपण जनतेचे रक्षण व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे पुण्याचे काम करण्याची संधी आम्हाला मिळाली असल्याचे पोलीस दादांनी सांगितले .बालपणापासून जर विद्यार्थ्यांना पोलिसांशी सुसंवाद साधून कायदे काय असतात,आपण जर चुकीचे वागलो तर शाळेत शिक्षक सुधारण्यासाठी शिक्षा देतात तसेच मोठं झाल्यावर आपण काही गंभीर गुन्हा केला तर पोलीस शिक्षा करतात ही जनजागृती मोठ्या बरोबर बाल वयातही होणे अपेक्षित असल्याचे मत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी व्यक्त केले
.यावेळी चेअरमन रवींद्र खटोड,पोलीस ठाण्याचे अतुल लोटके,रामेश्वर ढोकणे,नवनाथ कुताळ,प्राचार्या वैशाली कुलकर्णी,मेघा गोरे,सोनाली ठोंबरे,आशा जाधव,आश्विनी ठोंबरे,पूजा धात्रक आदींसह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी बेलापूर पोलीस ठाण्याचे अतुल लोटके, रामेश्वर ढोकणे,आदींनीही संवाद साधला.पोलिसांसोबत काही तास घालवायला मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. शेवटी पोलीस दादांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आला .