दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा करून निदर्शन.

दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा करून निदर्शन.
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळण्याची मागणी- प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील. अहमदनगर (प्रतिनिधी)- दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा करून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मान करण्यात यावा व इतर विविध मागण्या संदर्भात निदर्शन करताना दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील समवेत जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे, आर.बी.रंधवे साहेब,जिल्हा संपर्कप्रमुख कडूबाबा लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड.लक्ष्मण बोरुडे, भिंगार शहराध्यक्ष वरून वाघमारे, तालुका अध्यक्ष रफिक शेख, वजीरभाई शेख, सागर वैराळ, प्रथमेश देव, मनोज केसरकर, आर.एम.गिरवले, ए. एम.बनसोडे, सुरेंद्र घारू, , ईश्वर ससाणे, प्रमोद ससाणे, निलेश माळी, अनिकेत गायकवाड, प्रमोद वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, कर्मा वावरे, आदर्श चांदणे, अमोल जगधने, कुंदन चांदणे, आशिष जाधव, आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक जागतिक कीर्तीचे लेखक आणि कलावंत आहेत दीड दिवसाचे शिक्षण घेतलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी महान असा लेखन प्रपंच निर्माण केला महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांचे ग्रंथ कथा कादंबऱ्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाले आहेत जगातील 27 भाषांमध्ये त्यांचे साहित्य भाषांतरित झालेले आहे वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्मलेले अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी कामगार वर्गासाठी खर्च केले आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये संपूर्ण बीणीचे शिलेदार म्हणून त्यांनी आघाडीवर कार्य केले आहे त्यांच्या शाहिरीने महाराष्ट्रातील जनसामान्य जागवला आहे अनेकांना प्रेरणा दिली आहे आणि आज तर मातंग समाजाचे ते श्रद्धास्थान म्हणून उभे आहेत महाराष्ट्र आणि भारताबाहेरही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते
एखाद्या लेखकाचा किंवा कलावंताचा असा सन्मान होणे ही एक दुर्लभ अशी गोष्ट आहे म्हणूनच अशा या महान लेखक व कलावंताचा योग्य तो सन्मान व्हावा यासाठी त्यांना भारतरत्न देण्यात यावे तसेच मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे व बार्टीच्या धरतीवर मातंग समाजासाठी स्वतंत्र आर टी ची स्थापना व्हावी तसेच सर्व मागासवर्गीय महामंडळाची कर्ज माफ करण्यात यावी व अण्णाभाऊ साठे महामंडळाचे भाग भांडवल १ हजार कोटी करण्यात यावे. इत्यादी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले व या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष केल्यास किंवा विलंब केल्यास दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा निवेदनात म्हटले आहे.