कामे न करताच लाखो रुपये उचलल्याने ग्रामसेवक सरपंचावर होणार का कार्यवाही*

*जातेगाव ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार* ?
*कामे न करताच लाखो रुपये उचलल्याने ग्रामसेवक सरपंचावर होणार का कार्यवाही*
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामपंचायत सरपंच सतिश चव्हाण व ग्रामसेवक यांनी मिळून विविध कामात नुसते कागदपत्रे दाखवून लाखो रुपये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अशोक कारके व पांडुरंग जाधव यांनी रीतसर कार्यवाही चा अर्ज निवेदन गटविकास अधिकारी कांबळे मॅडम यांना गेवराई पंचायत समिती येथे दिले आहे सरपंच व ग्रामसेवक यांनी 15 वित्त आयोगामध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गट विकास अधिकारी यांनी तात्काळ कामाचे पाहणी करावी व सर्व बीले तात्काळ रोखावेत नसतात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ही ईशारा देण्यात आला आहे
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामपंचायत सरपंच सतिश चव्हाण व ग्रामसेवक यांनी पंधरा वित्त आयोग घरकुल नाली बांधकाम सिमेंट रस्ते शेततळे,रोजगार हमीचे कामे पांदन रस्ते, सोच खड्डे, यासह अंडरग्राउंड नाली, व कोरोणा मध्ये फवारणी न करताच सॅनिटायझर न वाटप करताच बिले उचलले आहेत, व तसेच गाय गोटे,मोहगणी, अशा अनेक कामाचे खोटी कागदपत्रे दाखवून पैसे उचलण्याचा प्रकार जातेगाव येथे घडला आहे, जातेगाव येथे सिमेंट, रस्ता,नाली न करताच बांधकामासाठी आलेला निधी ग्रामसेवक व सरपंच यांनी कोणतेही काम न करता उचलून घेतलेला आहे आजवर ग्रामपंचायत सदस्यांना कोणतीही मीटिंग न घेता सदस्यांना काही न सांगता मनमानी कारभार केला असून विविध विकास कामात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे, सरपंच व ग्रामसेवक यांची तात्काळ चौकशी करून जातेगाव येथे पंधरा वित्त 14 वित्त आयोगातून झालेल्या कामाची पाहणी करावी व त्यांचे तात्काळ बिल रोखावेत नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रा प सदस्य प्रतिनिधी पांडुरंग जाधव व प्रतिनिधी अशोक कारके यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे