*तिर्थ क्षेत्र आळंदी असल्याने येथे कुर्बानीच करत नाही ही परंपरा*

*आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने आळंदी दक्षता कमिटी ची बैठक*
*तिर्थ क्षेत्र आळंदी असल्याने येथे कुर्बानीच करत नाही ही परंपरा*
आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली असल्याने नेहमी प्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आळंदी पोलिस स्टेशन येथे दक्षता समिति ने बैठकीचे आयोजन केले होते. बकरी ईद निमीत्त सर्व मुस्लीम बांधवांना काही सूचना असल्यास तसेच आषाढी एकादशी बाबत आळंदीतील मुस्लीम धर्मियांच्या कुर्बानी बाबत विचार विनिमय करण्यात आला .यावेळी ग्रामस्थ आळंदीकर यांचे वतीने तसेच दक्षता कमिटी सदस्य माजी नगरसेवक डी डी भोसले पाटिल आणि माजी नगरसेवक श्री प्रकाश कुऱ्हाडे पाटिल यांनी मार्गदर्शन केले. यात मुस्लिमांच्या वतीने मत मांडताना ॲड नाजिम शेख यांनी आळंदी तीर्थ क्षेत्र असल्याने आमच्या वाड वडिलांनी माउलींच्या या पवित्र क्षेत्री कुर्बानी करायची नाही . हे त्यांच्या हिंदु धर्म मित्रांना दिलेले वचन आम्हीं खंड न पडता पाळत आहोत याची माहिती दिली. श्री डी डी भोसले पाटिल यांनी याबाबत बोलताना सांगीतले की मुस्लीम समाजावर आमचा विश्वास कायम असून माऊलींचे गाव पावित्र हा समाज पाळत आहे तसेच आळंदीत कुर्बाणीच होत नाही हा एकमेव अभिमान वाटावा असा पायंडा असल्याचे सांगीतले. माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील यांनी आपले मत मांडताना सांगीतले की कायदा सुव्यवथा बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर सांभाळण्याची या भूमीत कधीही गरज पडणार नाही.तसेच दोन्हीं समाज गुण्या गोविंदाने नांदत असल्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम आहे ती राहील अशी ग्वाही दिली आहे. श्री डी डी भोसले पाटिल यांनी मुस्लीम समाज हा आम्हीं वेगळा मानतच नाही हेही या निमीत्ताने अधोरेखीत केले आहे. या वेळी महिलांच्या वतीने पुष्पाताई कुऱ्हाडे, मुस्लीम समाजाच्या वतीने ॲड नाजिम शेख ,ॲड सोहेल शेख.सुलतान शेख. हमीद शेख. निसार सय्यद. महंमद हकीम. उपस्थित होते.पोलिस गोपनीय विभाग श्री मच्छिंद्र शेंडे साहेब यांनी सर्वांचे आभार मानले आहेत तर आळंदी पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक श्री रमेश पाटील साहेब यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे