राजकिय
शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी प्रारंभ

शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी प्रारंभ
टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीस शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला आहे. अशी माहिती तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे यांनी दिली.
संपर्क कार्यालयात सदस्य नोंदणीसाठी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली असून तालुक्यात शहर व ग्रामीण भागात दहा हजार सदस्य नोंदणी करणार असल्याचा संकल्प कोकणे यांनी व्यक्त केला आहे.
ज्येष्ठ शिवसैनिक अशोकराव थोरे, शहर प्रमुख सचिन बडदे, उपतालुकाप्रमुख प्रदीप वाघ, शरद भंणगे, विजय बडाख, सुनील गायकवाड, संपतराव जाधव, अतुल शेटे, सुधीर वायखंडे, ज्ञानेश्वर गर्जे, यासीन सय्यद, किशोर फाजगे, बाळासाहेब दुधाळे उपस्थित होते.