आरोग्य व शिक्षण
न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान येथे केंद्राची शासकीय चित्रकला स्पर्धा परीक्षा 394 विद्यार्थी सहभाग,

टाकळीभान येथे न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान येथे केंद्राची शासकीय चित्रकला स्पर्धा परीक्षा 394 विद्यार्थी सहभाग,
केंद्राच्या शासकीय चित्रकला स्पर्धा – 2022 पार पडली. ही स्पर्धा परीक्षा चार गटांमध्ये घेण्यात आली.0ते 7,7ते 9,9ते 12आणि 12ते 16अशा वयोगटात ही परीक्षा घेण्यात आली. टाकळीभान केंद्रातील सर्व शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.सर्व स्पर्धकांना टाकळीभान विद्यालयाचे प्राचार्य श्री इंगळे सर यांनी शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थी आपल्या कंपनीतून वेगवेगळ्या चित्राचे आकार साकारत होते.सर्व विध्यार्थी चित्र काढण्यामध्ये रंगून गेले होते. या स्पर्धेसाठी टाकळीभान शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल कडू सर, गोरख शिंदे सर. कुमार कानडे सर, चेमटे सर,भोपे सर , वारे मॅडम उपस्थित होते.स्पर्धेत एकूण 394 विध्यार्थी सहभागी झाले होते.