शनिवारी, ३० तारखेला हवामान अभ्यासक पंजाबराव डख सोनईत.

शनिवारी, ३० तारखेला हवामान अभ्यासक पंजाबराव डख सोनईत.
मुळा बाजार ,सोनईच्या खत विक्री केंद्राचा शुभारंभ.
ऐन लागवड,पेरणी हंगामात शेतकऱ्यांची रासायनिक खतांसाठी नेहमीच होणारी धावपळ, यातून पिकांना वेळेवर खते न मिळाल्याने होणारे पिकांचे नुकसान यावर पर्याय म्हणून सोनई, ता. नेवासा येथील मुळा बाजारच्या वतीने सोनई परिसरासह नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना हाकेच्या अंतरावर रास्त भावात विविध प्रकारची रासा यनिक खते उपलब्ध व्हावेत यासाठी शनीवारी, दि. 30 जुलै 2022 रोजी सकाळी ९.३० वाजता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या शुभहस्ते खत विक्री केंद्राचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
बदलते हवामान,नवीन पीक पद्धती,हवामानावर आधारित किफायतशीर शेती,पीक पाणी व्यवस्थापन यांवर पंजाबराव डख मार्गदर्शन करणार असून अचूक हवामान अंदाज वर्तवणारे पंजाबराव डख यांना पाहण्यासाठी व त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी मुळा बाजार सोनई येथे होणाऱ्या कार्यक्रमप्रसंगी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख हे भूषविणार आहेत. याप्रसंगी जिल्हा परिषदचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनीलराव गडाख, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, मुळा चे चेअरमन नानासाहेब तुवर, व्हाइस चेअरमन कडूबाळ कर्डीले, रावसाहेब कांगुणे सभापती, किशोर जोजार उपसभापती, डॉ शिवाजी शिंदे, चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा , प्रभाकर कोलते, चेअरमन खरेदी विक्री संघ, सौ. योगीताताई पिंपळे, नगराध्यक्ष नेवासा नगरपंचायत , लक्ष्मण जगताप उपनगराध्यक्ष, सीताराम झीने- चेअरमन, मुळा सहकारी बँक आदींसह सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत. मुळा बाजार सोनईच्या खत विक्री केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी सोनई परिसरासह नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पंजाबराव डख यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी सोनई येथील मुळा बाजार जवळील जगदंबा देवी मंदिर सभामंडप येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मुळा बाजार सोनईचे चेअरमन बाळासाहेब गोरे, व्हा. चेअरमन रामदास घुले व संचालक मंडळाने केले आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख.
अचूक हवामान अंदाज वर्तवणारे शेतकरी पुत्र असलेले पंजाबराव डख प्रथमच सोनई परिसरात येत असल्याने त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव येणार आहेत.