टाकळीभान कबड्डीची पंढरी असून, इथल्या मातीने अनेक खेळाडू घडवीले

टाकळीभान कबड्डीची पंढरी असून, इथल्या मातीने अनेक खेळाडू घडवीले
टाकळीभान कबड्डीची पंढरी असून ,इथल्या मातीने अनेक खेळाडू घडविले आहे, असे प्रतिपादन खेळाडूंचा सत्कार प्रसंगी उपसरपंच कानोबा खंडागळे यांनी केले,
येथील ओन्ली साई कबड्डी क्लब यांच्या वतीने दिप अमावस्या निमित्त कबड्डी ग्रांउड चे पूजन करण्यात आले. तसेच टाकळीभान गावचे भूषण प्रो कबड्डीपटू मा अस्लम इनामदार यांनी महाराष्ट्र संघात खेळात हरियाणा राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने चरखी,दादरी – हरियाणा येथील ६९ व्या राष्ट्रीय पुरुष संघात सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्राला उपविजेते पद (रौप्य पदक) मिळवून दिल्याबद्दल त्यांचा छोटेखानी सत्कार आयोजित करण्यात आला होता . प्रो.कबड्डी स्टार मा.अस्लम इनामदार यांचा सत्कार उपसरपंच कान्हा खंडागळे यांचे हस्ते करण्यात आला . याप्रसंगी बोलताना उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की टाकळीभान हे कबड्डी ची पंढरी असून इथल्या मातीने अनेक खेळाडू घडवले प्रो.कबड्डी स्टार मा.अस्लम इनामदार , मा.श्रीराम मैड, मा.गोरे मा.शुभम पटारे हे इथल्या मातीतून निघालेले हिरेअसून प्रो कबड्डी स्टार अस्लम टाकळीभान चे कबड्डी खेळात उंचवले असून प्रो कबड्डी स्टार अस्लम इनामदार लवकरच भारतीय कबड्डी संघात* खेळाताने दिसेल तो दिवस टाकळीभान च्या कबड्डी इतिहासातील सुवर्ण दिन असेल माती वरील कबड्डी बरोबरच मॅट वर कबड्डी खेळण्याचे तंत्र विकसित करण्याची गरज असून लोकसहभागातून गावातील कबड्डी खेळाडूंना पुढील 2 महिन्यात मॅट अंदाजे रक्कम 2,50,000 उपलब्ध करुन देऊ गावातील कबड्डी व इतर खेळातील खेळाडूंना सर्वतोपरी मदत करु असा शब्द उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी दिला, या प्रसंगी मा.तंटामुक्ती उपाध्यक्ष विलास सपकळ, मा.पांडू मगर, मा.राहुल कोकणे, मा.सतीश कांगुणे, मा.सुभाष सपकळ, मा.गणेश इथापे, मा.वसीम इनामदार ,मा.गद्देवाड सर, मा.वेताळ सर , मा.प्रशांत कोकणे, मा.बाबा इनामदार, मा.सोमा चितळे यांसह ओन्ली साई चे खेळाडू व कब्बडी प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..