मंडल अधिकारी सारिका वांडेकर सह खाजगी एजंट लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले

मंडल अधिकारी सारिका वांडेकर सह खाजगी एजंट लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सारिका वांडेकर हिने फेर मंजूर करून देण्यासाठी चक्क समोरच्या व्यक्तीस खाजगी एजंट करवी दोन हजार रुपयाची मागणी करून ती आज स्वीकारताना खाजगी एजंट कडून समक्ष स्वीकारताना आज रोजी लाच लुचपत विभागाने कारवाई करून रंगे हात पकडले आहे.
*आरोपी*
१) सारिका भास्कर वांढेकर, वय – ४१वर्ष, मंडळाधिकारी, मंडळाधिकारी कार्यालय,
बेलापूर, बुद्रुक,ता- श्रीरामपूर, जि. अहमदनगर
२)बाबासाहेब बाबुराव कदम (खाजगी इसम)
वय-५२ रा राजुरी ता राहता जि अहमदनगर असे वरील आरोपी असून
तक्रारदार हे शेतकरी असुन, त्यांची ऐनतपुर शिवारातील गट नं २१ मधील ०.३५ हेक्टर क्षेत्र हे त्यांना वारसा हक्काने वाट्यास आलेले आहे,त्याची फेरफार नोंद मंडळ अधिकारी बेलापूर, बुद्रुक यांचेकडे प्रलंबीत होती सदर फेरफार नोंद घेण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी २०००/-₹ लाचेली मागणी केली बाबतची तक्रार ला.प्र.वि. अहमदनगर कडे तक्रार प्राप्त झाली होती, त्यानुसार आज रोजी बेलापूर बुद्रुक गावी पडताळणी करण्यात आली, पडताळणी दरम्यान यातील आरोपी क्र १ यांनी आरोपी क्र.२ यांना तक्रारदार यांचेकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले व आरोपी क्र २ तक्रारदार यांचेकडे मंडळ अधिकारी यांचे करिता २०००/-₹ लाच मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले असे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले,
त्यानुसार मंडळाधिकारी कार्यालय,बेलापुर बुद्रुक येथे सापळा लावला असता सदर सापळा कारवाई दरम्यान आरोपी क्र.२ कदम *यांनी पंचा समक्ष २०००/-₹ लाच रक्कम तक्रारदार यांचे कडून स्वीकारली असता त्याना रंगेहाथ पकडण्यात आले आह श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे
*सापळा अधिकारी*:-
शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर
*पर्यवेक्षण अधिकारी** प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
सापळा पथक* -पोलीस अंमलदार पोना रमेश चौधरी, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, पोलीस अंमलदार सचिन सुद्रूक चालक- दशरथ लाड,
आदींनी कारवाई केली.