दिव्यांगाची सेवा हीच परमेश्वराने दिलेली खरी जनसेवेची संधी – रामेश्वर भूते*

*दिव्यांगाची सेवा हीच परमेश्वराने दिलेली खरी जनसेवेची संधी – रामेश्वर भूते*
*सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर भूतेंकडून मतिमंद विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन*
पुण्य मिळविण्याकरीता दान, धर्म करुन गोरगरीब व गरजु व्यक्तीसह दिव्यांग बांधवांना मदत केली पाहिजे. तसेच दिव्यांगांची सेवा हीच परमेश्वराने दिलेली खरी जनसेवेची संधी होय असे मत सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर भूते यांनी व्यक्त केले.
रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महांडुळा संचलित मतिमंद निवासी विद्यालय गेवराई येथे रविवार दि.४ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशीचे औचित्य साधून येथील सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर भूते यांच्या वतीने ५० मतिमंद विद्यार्थ्यांना एक दिवसाच्या मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पत्रकार विनायक उबाळे, यश मोरे, कार्तिक भुते, कविता मोरे, सुनीता भुते, संगीता मोरे, शोभा काळे, पार्थ भुते, अमोल काळे यांच्यासह आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर भुते म्हणाले की सामाजिक जाणिवेतून प्रत्येकाने या ठिकाणी येवून या दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत आपला आनंद द्विगुणित करावा हा आनंद आपल्याला इतरत्र कुठेही मिळणार नाही. तसेच अन्नदान सारखे दुसरे कुठलेच मोठे दान नाही. त्यामुळे प्रत्येकाने अन्नदान करावे असे आवाहनही शेवटी बोलताना त्यांनी व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.