अपघात

एसटीच्या अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

एसटीच्या अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

 

मध्य प्रदेशातील धारमध्ये भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून अमळनेरला येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या एसटीच्या अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मध्य प्रदेशच्या धारमध्ये कठडा तोडून एसटी नर्मदा नदीत कोसळली.

बस सकाळी ७.३० ला इंदूरहुन निघाली होती. या बसमध्ये अंदाजे ५० ते ६० प्रवासी होते. यामध्ये १३ लहान मुलांचा समावेश होता. चालक आणि वाहकासह आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. बसचालक चंद्रकांत एकनाथ पाटील आणि वाहक प्रकाश श्रवण चौधरी यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. यातील पाच मृतदेहांची ओळख पटली आहे. तसेच आतापर्यंत २५ ते २७ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

 

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एसटी इंदूरहून अमळनेरला येत होती. त्यावेळी समोरून दुचाकीस्वार भरधाव वेगाने येत होता. त्याला वाचवण्यासाठी चालकाने बस बाजूला केली असता काही तांत्रिक कारणामुळे बस थेट कठडा तोडून नर्मदा नदीत पडली आहे.

 

नदीत कोसळल्या बसला बाहेर काढण्यात आली असून, त्या बसचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहेत. अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने हेल्पलाईन नंबर दिला आहे. ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन असल्याची माहिती मिळाली.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे