टाकळीभान येथे वाढीव दुभाजक, गतीरोधक, फुटपाथ करावे.—सा.बा.कडे निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीची मागणी.

टाकळीभान येथे वाढीव दुभाजक, गतीरोधक, फुटपाथ करावे.—सा.बा.कडे निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीची मागणी.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सुरू असलेल्या श्रीरामपूर—नेवासा राज्यमार्गाचे कामाबाबत टाकळीभान ग्रा.पं. वतीने साबाचे नितीन गुजरे यांना निवेदनाद्वारे वाढीव दुभाजक, गतीरोधक, फुटपाथ करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सदर रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी बैठक घेण्यात आली आहे. या निवेदनावर सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रामविकास अधिकारी आर.एफ.जाधव यांच्या सह्या आहे.
श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू असून टाकळीभान स्टॅन्ड परिसरात या रस्त्यावर वाढीव दुभाजक करावे, योग्य ठिकाणी गतीरोधक करावे, गावकमानी समोर हायमास्ट दिवा लावावा, दुभाजकामध्ये स्र्टीट लाईट बसवावे, दुभाजकामध्ये शोभा वाढवणारी झाडे लावावी, डांबरीकरण झाल्यापासून 6 मीटर पर्यंत माती मुरूम काढण्यात येणार असून त्या जागेवर पेव्हींग ब्लाॅक बसवावे. जेणेकरून थांबलेल्या वाहनांची पार्कींग तसेच पायी चालणार्यांना फुटपाथ म्हणून वापर करता येईल. तसेच स्टॅन्डवर छोटेसे व सुविधायुक्त बसस्थानक बांधावे. आदी कामाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगीतले. त्याचबरोबर वाढीव कामाबाबत आ.लहु कानडे यांचेकडे वाढीव निधीसाठी मागणी करण्यात येणार आहे. टाकळीभान घोगरगांव रस्त्याचे काम सुरू असून सदर काम मौजे घोगरगावकडून टाकळीभानकडे सुरू असून सदर रस्त्याचे काम गणेश कोकणे यांच्या वस्तीपर्यंत येणार असून कोकणे वस्ती ओढ्यापर्यंत काम सदर ठेकेदाराकडून करून घेण्याची मागणी करण्यात आली असून टाकळीभान कमान ते ओढ्यापर्यंतचे रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव साबाला लवकरच देण्यात येणार असल्याचे उपसरपंच खंडागळे यांनी सांगीतले.
यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विलास सपकळ, ग्रा.पं.सदस्य सुनिल बोडखे, ग्रामविकास अधिकारी आर.एफ.जाधव आदी उपस्थित होते.