आई वडिलांच्या हस्ते निळकंठेश्वर व्यसनमुक्ती केंद्राची केले उद्घाटन
करमाळा तालुक्यातील कात्रज येथील काल दिनांक 6एप्रिल2023 रोजी निळकंठेश्वर व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आई-वडिलांच्या हस्ते संपन्न झाले.
कात्रज गावचे सुपुत्र पत्रकार श्री. अक्षय नारायण वरकड यांनी समाजातील व्यसनाधीन लोक पाहिली असता व त्यांचे समाजातील अनुभव घेतले असता त्यांनी असा निर्णय घेतला की पत्रकारितेबरोबरच एक जनहिताच काम करावं आणि त्यांनी हे आज करून दाखवलं व आई-वडिलांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन केले. समाजातील अनेक लोक व्यसनामुळे अनेक लोकांची घरी उध्वस्त झाली आहेत. व मुलं वनवासी झालेले आहेत. या दारू या नशेच्या पायात त्यामुळे समाजाची दुरव्यवस्था पाहून पत्रकार सरांनी हा प्रकल्प उभारला आहे.
कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक गणेश (भाऊ) करे, करमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.कुंजीर साहेब, गावचे सरपंच श्री.मनोहर (बापू)हंडाळ,करमाळा पंचायत समिती सदस्य श्री.नागनाथ (काका)लकडे, डॉ.पाटील, श्री.पोपट पाटील,श्री.आप्पाराव पाटील, श्री.विलास मारकड, सुप्रसिद्ध व्याख्याते तात्यासाहेब धायगुडे, मोहन लकडे, डॉ.रॉय, श्री.प्रशांत सावंत, श्री.मोहन वरकड, श्री. मोहन धायगुडे, श्री.बाबाजी वरकड, पत्रकार महेश कानतोडे, पत्रकार चोपडे सर, पत्रकार सुनील डंगाणे, पत्रकार भगवान पाटील ,पत्रकार प्रवीण वाघमोडे, श्री.आबासाहेब हंडाळ,श्री.पांडुरंग हंडाळ, श्री.युसुफ सय्यद, ओंकार पाटील, श्री.नंदकिशोर पाटील, मामा श्री.नामदेव सावंत, विनोद सावंत व काही ग्रामस्थ व पाहुणे या कार्यक्रमास उपस्थित होते.
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.